Breaking | अमळनेर नगरपरिषदेचे २२ नगरसेवक अपात्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी |वाल्मिक जोशी

अतिक्रमण हटाव कारवाईप्रकरणी अधिकाराचा गैरफायदा घेतल्याने अमळनेरच्या लाेकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील आणि २२ नगरसेवकांना जानेवारी २०१८ मध्ये अपात्र करण्यात अाले होते. परंतू नगरविकास राज्यमंत्र्यांनी अवघ्या काही दिवसात तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या आदेशाला स्थगिती दिली होती. दरम्यान, आज विद्यमान जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी पुन्हा २२ नगरसेवकांना अपात्र केलेय. तर नगरध्यक्षा पुष्पलताताई पाटील यांचा निर्णय राखीव ठेवला आहे. तर तत्कालीन मुख्याधिकारी यांनी देखील दबावाखाली काम करून आपल्या कामात कसुर केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा अमळनेरसह जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे.

अमळनेरचे प्रांताधिकारी व मुख्याधिकाऱ्यांनी ६ एप्रिल २०१७ राेजी अतिक्रमण, गैरकायदा बांधकाम हटवण्यासाठी योजना तयार केली होती. गैरकायदा बांधकाम, अतिक्रमण हटवण्याचे आदेश प्रथमतः नगराध्यक्षांनी ३० मार्च २०१७ व ८ एप्रिल २०१७ रोजी दिले. त्यानुसार मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याची सर्व तयारी केली होती. परंतु अचानक ११ एप्रिल २०१७ स्थायी समितीच्या सभेत गैरकायदा बांधकाम व अतिक्रमण मोहीम स्थगित करण्यासाठी ठराव क्रमांक ५७ विषय क्रमांक ५६ घेण्यात आला. ठरावाला तक्रारदार तथा स्थायी समितीचे सदस्य प्रवीण पाठक यांनी लेखी विरोध केला होता. 15 एप्रिल, 2017 रोजी तातडीची सभा बोलवली व सभेत मुख्‍याध्किारी यांची अतिक्रमण हटाव योजना 17 एप्रिल 2017 रोजी राबवण्‍यात येणर होती. ती योजना तहकूब करण्‍यात आली होती. अतिक्रमण हटाव मोहिमेचा निर्णय बदलल्‍यामुळे अमळनेर तालुका शहर विकास आघडीच्‍या नगराध्‍यक्षा पुष्‍पलता साहेबराव पाटील व आघाडीच्‍या 22 नगरसेवकांना 6 वर्षांसाठी अपात्र घोषित करण्‍यात यावे, अशी मागणी आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीचे पालिकेतील गटनेते प्रवीण पाठक, सविता संदानशिव, सलीम टोपी यांनी जळगाव जिल्‍हाधिका-यांकडे 15 जून 2017 रोजी केली होती. सर्व नगरसेवक अपात्र देखील झाले होते.

दरम्यान, राज्य मंत्र्यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या आदेशाला स्थगिती दिल्यानंतर आमदार शिरीषदादा चौधरी हे खंडपीठात गेले होते. त्यानुसार खंडपीठाने राज्यमंत्र्यांना दोन आठवड्यात निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर राज्यमंत्र्यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यानी फेरसुनवाई करून निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार आज ते २२ नगरसेवक पुन्हा अपात्र झाले आहेत.

हे नगरसेवक झाले पुन्हा अपात्र

नगरसेवक शीतल राजेंद्र यादव, नूतन महेश पाटील, संतोष भगवान पाटील, सुरेश आत्माराम पाटील, नरेंद्र रामभाऊ संदानशिव, निशातबानो अनिसखान कुरेशी, मनोज भाऊराव पाटील, गायत्री दीपक पाटील, अॅड. चेतना यज्ञेश्वर पाटील, विवेक भीमराव पाटील, निशांत राजेंद्र अग्रवाल, संजय आनंदा मराठे, चंद्रकला अशोक साळुंखे, कुमार रामकृष्ण बापूराव पाटील, राजेश शिवाजी पाटील, कमलबाई पीतांबर पाटील, रत्नमाला साखरलाल माळी, रत्ना प्रकाश महाजन, विनोद रामचंद्र लांबोळे, प्रवीण साहेबराव पाटील, सलीम शेख फत्तू शेख, अभिषेक विनोद पाटील यांना आज पुन्हा अपात्र घाेषित करण्यात अाले अाहे.

Leave a Comment