रांची (झारखंड ) | जय श्रीरामाच्या घोषणा देण्यासाठी जबरदस्ती केल्याच्या झटापटीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना झारखंडमध्ये घडली आहे. रांची शहरात शम्स तरबेज या तरुणाला मोटार सायकल चोरीच्या संशयात मोठ्या जमावाने घेरले. त्यावेळी त्याला जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सांगितले. मात्र त्याने घोषणा दिल्या नाहीत म्हणून जमावाने त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Jharkhand: 22-yr-old Tabrez who was beaten up by locals in Saraikela Kharsawan on suspicion of theft & was later arrested, died at a hospital yesterday. He was admitted to Sadar hospital yesterday morning & later referred to Tata Main Hospital Jamshedpur pic.twitter.com/gozxTaC3wO
— ANI (@ANI) June 24, 2019
सदरचा प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे. त्यानंतर पिडीतास पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली. त्याच बरोबर त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले. मात्र त्याचा सात दिवसच्या उपचारानंतर आज मृत्यू झाला आहे. जमावाने सात तास मारहाण केल्याच तरबेजचा मृत्यू झाला आहे असे तरबेजच्या भावाने म्हणले आहे.
तरबेज हा पुण्यात वेल्डरचे काम करत होता.रमजान ईद साजरी करण्यासाठी तो आपल्या परिवारात झारखंडला गेला होता. त्याच दरम्यान त्याचा मूत्यू झाला आहे. तरबेजचे लग्न लग्न जमले होते. आणि येत्या काही दिवसात त्याचे लग्न होणार होते असे त्याच्या भावाने मध्यमांशी बोलताना सांगितले आहे. मात्र लग्न होण्या आधीच त्याला मृत्यूने वेढले आहे.