औरंगाबाद – मागील दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून, यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. परंतु काही कर्मचारी कामावर परत असल्याने एसटी महामंडळाने काही प्रमाणात बस सेवा सुरू केली आहे. काल दिवसभरात एसटी महामंडळाने विविध मार्गांवर 47 बसेस सोडल्या. या बसेसने 220 फिरा केल्या असून यातून 3300 प्रवाशांनी प्रवासाचा लाभ घेतला.
पुणे मार्गावर सर्वाधिक 19 खाजगी शिवसेनेने 36 फेऱ्या केल्या. यात 645 प्रवाशांनी प्रवास केला. दुसरीकडे नाशिक मार्गावरही पाच खासगी शिवशाही बस चालवण्यात आल्या आहेत. एसटीने कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बस सेवा सुरू केली आहे.
काल दिवसभरात औरंगाबाद विभागाने एकूण 47 बसने 220 फेऱ्या केल्या आहेत. यामध्ये 3316 प्रवाशांनी प्रवास करून आपले इच्छित स्थळ गाठले आहे.