मुंबईत 22000 कोटींचा SRS घोटाळा समोर आला, ED कडून ओंकार समूहाचे अध्यक्ष आणि एमडी यांना अटक

नवी दिल्ली । अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ओमकार समूहाचे अध्यक्ष कमल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना 22000 कोटींच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (Slum Rehabilitation Scheme SRS) घोटाळ्यात अटक केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ईडी ओमकार गटाशी संबंधित 10 तळांवर छापे टाकत होते. या छापेमारी दरम्यान ईडीला अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. ज्यानंतर या दोघांनाही बुधवारी चौकशी एजन्सीने प्रश्नांची उत्तरे मागविली होती. चौकशीत सहकार्य न केल्याबद्दल ईडीने या दोघांना अटक केली आहे.

असे आहे संपूर्ण प्रकरण…
ओमकार समूहाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी येस बँकेकडून 450 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेवरील खर्च दाखवून ओमकार ग्रुपवर कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा आरोप आहे. ED कडून त्यांचा तपास सुरू आहे आणि ही लोकं ED ला सहकार्य करत नव्हते, म्हणून ईडीने त्यांना बुधवारी अटक केली. त्यानंतर हे दोघेही गुरुवारी पीएमएलए कोर्टात हजर झाले असता त्यांना विशेष कोर्टाने ईडीच्या ताब्यात पाठवले.

इतर ठिकाणी गुंतवले कर्जाचे पैसे
येस बँकेकडून घेतलेले 450 कोटी रुपयांचे कर्ज रिइन्वेस्ट केल्याचा आरोप या ग्रुपवर करण्यात आला आहे. दरम्यान, ओंकार समूहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणतात की,”औरंगाबादच्या गुन्हे शाखेकडून नोंदविण्यात आलेल्या 410 कोटींच्या प्रकरणात ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.”

अनेक बँकांकडून घेतले कर्ज
ओंकार ग्रुपविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी सुरू आहे. एसआरए अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे ओंकार समूहाने अनेक प्रकल्पांसाठी लेटर ऑफ इंटेंट (LOC) ताब्यात घेतल्याचा आरोप याचिकेत केला आहे. त्या आधारे त्यांनी विविध बँकांकडून 22 हजार कोटींचे कर्ज घेतले. ओंकार ग्रुपवरही एसआरए प्रकल्पांसाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like