केदारनाथमधून तब्बल 228 किलो सोने झाले गायब; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केदारनाथ हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे. या ठिकाणी अनेक लोक भेट देतात. राजधानी दिल्लीमध्ये देखील आता केदारनाथ मंदिराची पायाभरणी सुरू झालेली आहे. आणि त्या पायाभरणी करण्यावरूनच अनेक वाद देखील निर्माण झालेले आहे. केदारनाथ मंदिराच्या पुजारांकडून ही पायाभरणी करण्याला कडाडून विरोध होत असताना. दुसरीकडे ज्योतिमठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी दिल्लीतील केदारनाथ मंदिर उभारण्यात देखील विरोध केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात सोन्याचा मुलामा देण्याच्या कामात देखील घोटाळा होत असल्याचा आरोप केलेला आहे. केरदारनाथ मंदिरातून तब्बल 228 किलोचा सोनं गायब झालेले आहे. आणि याचा हिशोब कोण देणार? असे देखील त्यांनी विचारलेले आहे.

यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितले की केदारनाथमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचा घोटाळा झालेला आहे. हा मुद्दा उपस्थित का केला नाही. केदारनाथमध्ये घोटाळा केल्यानंतर आता दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिर बांधले जाईल. तेथे पुन्हा एकदा घोटाळा होईल.असा आरोप देखील त्यांनी मांडलेला आहे.

मागील वर्षी केदारनाथ मंदिरामध्ये एका पुजाऱ्याने सोन्याच्या मुलामा लावण्याच्या कामांमध्ये तब्बल 125 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. त्याने सोन्याऐवजी पितळीचा मुलांना केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आलेला होता. परंतु मंदिर समितीने हा आरोप फेटाळून लावला. याबाबत देखील शंकराचार्य यांनी त्यांचे मत मांडले ते म्हणाले की, केदारनाथमध्ये तब्बल 228 किलोचा सोनं गायब झालेले आहे. त्याबाबत कोणत्याही प्रकारे कुठेही तपास केलेला नाही. परंतु यासाठी कोण जबाबदार असणार.