Tuesday, January 7, 2025

खळबळजनक !! राज्यातील ‘या’ शहरात एकाच वसतीगृहात सापडले 229 विद्यार्थी कोरोनाग्रस्त

वाशीम | येथील वसतिगृहातील 229 विद्यार्थी आणि 3 कर्मचारी कोरोना पोझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. या वसतिगृहात अमरावती, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला येथील एकूण 327 विद्यार्थी राहतात.

वाशिम जिल्ह्यातील देगाव परिसरात एक आदिवासी निवासी शाळा आहे. या शाळेतील 327 पैकी एकूण 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विद्यार्थ्यांसह चार कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना झालेले बहुतांश विद्यार्थ्यांचे वय हे 13 ते 15 इतके आहे. तसेच बहुतांश विद्यार्थी हे अमरावती जिल्ह्यातील धारणी,अचलपूर आणि मेळघाट पट्टयातील भागातील आहेत.