कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कराड तालुक्यात आज तब्बल २३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकाच दिवशी तालुक्यातील एकूण २३ जण कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे.
एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण बरे झाले असल्याने कराडकरांना दिलासादायक मिळाला आहे. कराडच्या कृष्णा हॉस्पिटल मधुन यशस्वी उपचार घेऊन २० जण व सह्याद्री हॉस्पिटल मधुन ३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. या २३ जणांचे १४ दिवसांनंतर चे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती मिळाली आहे.
आज कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे उपचार घेत असलेले, कराड तालुक्यातील वनमासमाची येथील 7, साकुर्डी येथील 2, आगाशिवनगर येथील 4, उंब्रज येथील 1, गोटे येथील 1, बनवडी येथील 1, गमेवाडी येथील 1, तांबवे येथील 1, मलकापूर येथील 1 व साताऱ्यातील शाहूपुरी येथील 1 असे एकूण 20 कोरोनाबाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दरम्यान, आजपर्यंत कराड तालुक्यात एकूण ८२ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कराड पाटण तालुक्यात सद्यस्थितीत एकुण १०९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. कराड मध्ये आता 26 कोरोना अॅकटिव पेशंटवर उपचार सुरु आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”