लोणावळ्याहून पाचगणीत आलेल्या ‘त्या’ २३ जणांपैकी कोणीही कोरोना पोझिटिव्ह नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

लोणवळा जवळच्या खंडाळा येथुन महाबळेश्वर मध्ये एका बंगल्यात राहण्यासाठी शासनाचे आदेश धुडकावुन मुंबईच्या एका मोठया उदयोगपतीसह त्याच्या कुटूंबातील 9 जण आणि त्यांचे नोकर 14 असे एकुन 23 जणांना पांचगणी येथील एका खास इमारतीत इन्स्टीटयुशनल होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वाची वैदयकिय तपासणी करण्यात आली असुन या मध्ये एकही करोना पॉझिटीव्ह नसल्याचे निष्पण झाले आहे.

कोरोना व्हायरचा धोका लक्षात घेता संपुर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे शासनाच्या आदेशा नुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्हयाच्या सर्व सिमा बंद केल्या असुन जिल्हा ओलांडुन कोणालाही प्रवेश दिला जात नाही असे असतानाही मुंबईचे एक प्रसिध्द उदयोगपती आपल्या कुटुंबातील 9 सदस्य तसेच 14 कर्मचारी असे 23 जण महाबळेश्वरकडे आले होते. सोबत एका मोठ्या आय.पी.एस. अधिकार्‍याचे पत्र बरोबर असल्यामुळे त्यांना कोणीही रस्त्यात थांबविले नाही. महाबळेश्वरात त्यांनी प्रवेश केल्या नंतर ही खबर महाबळेश्वर नगरपालिका प्रशासनाला समजली. पालिका प्रशासनाने घटना स्थळी जाऊन या उद्योगपतीचे संपुर्ण कुटूंब क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला.

जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार  बंगल्यातील सर्वांची ग्रामिण रूग्णालयातील वैदयकिय अधिकारी यांनी तपासणी केली. या तपासणी मध्ये कोणालाही करोनाची बाधा झाल्याची लक्षणे आढळली नाहीत. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची माहीती उदयोगपतीला दिली. महाबळेश्वर येथुन पाचगणी येथे शासनाच्या एका खास इमारती मध्ये या उदयोगपतीचे संपुर्ण कुटुंबाला इन्स्टीटयुट क्वारंटाईन करण्यात आले आहे. आता पुढील 14 दिवस याच इमारती मध्ये या उदयोगपतीच्या कुटूंबाचा मुक्काम असेल. या इमारतीला चोहो बाजुंनी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असुन या इमारती मधुन आता कोणालाही बाहेर पडता येणार नसल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे.

Leave a Comment