उस्मानाबाद प्रतिनिधी | सातत्यपूर्ण अभ्यास आणि वाचन ही सुत्रे आत्मसात केली तर ध्येय गाठण्याचा मार्ग सूकर होतो. याचाच प्रत्यय पुजा गायकवाड यांच्या यशाने दाखवून दिला आहे. वयाच्या २३ व्या वर्षीच पुजा महाराष्ट्र लोकसेवा आयोगा च्या परिक्षेत यशस्वी होऊन उपजिल्हाधिकारी पदी नियुक्त झाल्या आहेत.
अभ्यासावर आणि स्वविश्वास मनात तेवत ठेवणे मोठ जिकिरेच काम असल तरी त्यावर मात करत आपण आपल्या ध्येयावर लक्षकेन्द्रित करायला हव अस तीने हेलो महाराष्ट्र शी बोलताना सांगितलं. कोणतीच गोष्ट सहज मिळत नसते त्याला मेहनतीची आणि सातत्याची जोड़ आवश्यक आहे तरच ते मिळत असही यावेळी ती म्हणाली. आपल्या परिथितिचा अंदाज असतानाही पूजा गायकवाड या विद्यार्थिनीने मेहनत आणि सातत्य पूर्ण अभ्यासातून महाराष्ट्र लोकसेवेच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवल आहे.
पूजा ही उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. मराठवाड्याचा टक्का हा महाराष्ट्र लोकसेवेत पूर्वीपासूनच अधिक राहिला आहे. घरची परिथिति फारशी समाधान कारक नाही परंतु कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा असलेल्या पूजा ने अनेक वेळा परीक्षा देऊन ही यश मिळत नव्हतं अखेर तिचं स्वप्न पूर्ण झाल आहे. अवघ्या २३ व्या वर्षी उपजिल्ह्यधिकारी झालेल्या पूजाचं सर्वत्र कौतुक होत आहे.