औरंगाबाद | शहरात कोरोना रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्याबरोबरच म्युकरमायकोसिसचे रुग्ण कमी होत असताना दिसून येत आहेत. यामुळे अनेक जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत आहे त्याबरोबरच गेल्या दोन दिवसात शहरात एकही मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापूर्वी कोरोना नंतर म्युकरमायकोसिसने थैमान घातले होते. आता रुग्ण संख्या आटोक्यात येत असल्याने दिलासा मिळत आहे. सध्या उपचार आधिन रुग्णांची संख्या 230 पर्यंत खाली आली आहे. बुधवारी नवीन चार तर गुरुवारी सहा रुग्ण दाखल झाले आहेत.
त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 1059 इतकी झाली आहे. सध्या शहरात 230 ऍक्टिव रुग्ण उपचार घेत आहेत. एमजीएममध्ये 68, घाटीत 53, डॉ. हेडगेवारमध्ये 31, एमआयटीमध्ये 26, यूनाइटेड सिग्मामध्ये 12, देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ मॅक्झीलो सर्जरी अँड रिसर्च सेंटरमध्ये 7, बजाजमध्ये 6, ओनियन सिटी केअर सुपरस्पेशालिटीमध्ये 4, अॅपेक्समध्ये 5, धूत मध्ये 5, येथे पाच रुग्ण दाखल आहेत.