मुंबई : हॅलो महाराष्ट्र – संपूर्ण देशात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले होते. आता कुठे हि परिस्थिती सुरळीत होत होती तर आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. अशातच मुंबईत कामाच्या शोधात आलेल्या एका बंगाली अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये आपण कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगून आरोपी भामट्याने या अभिनेत्रीचे अर्धनग्न फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे लुटले.
ओम प्रकाश तिवारी असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. मालाड सायबर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे. हा आरोपी फेसबुकवरून आपण कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगत होता. हा आरोपी तरुणींना वेब सीरिजमध्ये काम मिळवून देतो असं सांगून त्यांचे फोटोशूट करायचा. त्यानंतर त्यांचे अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळत होता. हा आरोपी नेटफ्लिक्स प्रोडक्शन हाऊसमध्ये आपण कास्टिंग डायरेक्टर आहे असे सर्वांना सांगत होता.
यादरम्यान एका बंगाली अभिनेत्रीने डिसेंबर 2021 मध्ये आरोपीशी फेसबुकवर संपर्क केला होता. त्यानंतर आरोपीने या अभिनेत्रीला मुंबईला भेटण्यासाठी बोलावून घेतलं होतं. त्यानंतर ओम तिवारीने या अभिनेत्रीला वेब सीरिजमध्ये काम मिळवून देतो असे आमिष दिले. यानंतर त्याने या अभिनेत्रीचे ऑडिशनच्या नावावर फोटोशूट केले. त्यानंतर या अभिनेत्रीला त्याने काम तर दिले नाही, उलट फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. यानंतर या अभिनेत्रीने मालाड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आयपीसी 345A,B,67A नुसार गुन्हा दाखल करून या आरोपीला अटक केली आहे.