LIC च्या ‘या’ योजनेत दरमहा 45 रुपये जमा करून मिळवा 25 लाख रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC कडून ग्राहकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. LIC मध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. यामुळेच देशातील अनेक लोकांनी यामध्ये गुंतवणूक करण्यास रस दाखविला आहे. LIC ने ग्राहकांसाठी एकापेक्षा एक उत्तम पॉलिसी लाँच केल्या आहेत. यापैकीच एक योजना म्हणजे LIC ची जीवन आनंद योजना आहे. जर कोणाला कमी प्रीमियममध्ये भविष्यासाठी मोठा फंड उभा करायचा असेल तर जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक करता येईल.

LIC rolls out new customer-centric initiatives

एक लाखाचा सम एश्युअर्ड

हे लक्षात घ्या कि, हीपॉलिसी ही टर्म पॉलिसीसारखीच आहे. यामध्ये पॉलिसीच्या कालावधीसाठी प्रीमियम भरता येईल. या योजनेमध्ये पॉलिसीधारकाला अनेक मॅच्युरिटी बेनिफिट देखील मिळतात. या पॉलिसीमध्ये एक लाखाचा सम एश्युअर्ड आहे. तसेच जस्तीची कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.

रायडर देखील मिळतात

ही पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीला एक्सीडेंटल डेथ अँड डिसेबिलिटी रायडर, एक्सीडेंट बेनिफिट रायडर, न्यू टर्म इन्शुरन्स रायडर आणि न्यू क्रिटिकल बेनिफिट रायडर असे एकूण चार रायडर दिले जातात. मात्र ही पॉलिसी घेणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची कर सवलत दिली जात नाही.

LIC IPO subscription status: Retail portion fully subscribed on day 3 of the issue. Check updates here | Mint

25 लाख रुपये कसे मिळवायचे?

या पॉलिसीमध्ये दर महा 1358 रुपये जमा करून 25 लाख रुपये मिळवता येतील. मात्र यासाठी दीर्घकाळासाठी गुंतवणूक करावी लागेल. तसेच जर यामध्ये 35 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर 25 लाख रुपये मिळतील. ही रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला दररोज ४5 रुपये वाचवावे लागतील. अशा प्रकारे, यामध्ये दर महा 1358 रुपये तर वार्षिक सुमारे 16,300 रुपये जमा करावे लागतील.

अशा प्रकारे मिळेल बोनस

अशाप्रकारे 35 वर्षांत एकूण 5.७0 लाख रुपये जमा होतील. यामध्ये मूळ विमा रक्कम पाच लाख रुपये असेल. याशिवाय, 8.60 लाख रुपयांचा रिव्हिजनरी बोनस आणि 11.50 लाख रुपयांचा अंतिम बोनस देखील दिला जाईल. यासोबतच जीवन आनंद पॉलिसीमध्ये दोनवेळा बोनस देखील मिळेल. मात्र यासाठी पॉलिसी 15 वर्षांची असावी लागेल.

LIC employee union planning nationwide protest against stake sale

डेथ बेनिफिट

पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास, नॉमिनीला पॉलिसीच्या बेनिफिटच्या 125% रक्कम मिळेल. त्याच वेळी, जर पॉलिसी धारकाचा पॉलिसीच्या मॅच्युरिटीपूर्वी मृत्यू झाला तर नॉमिनीला निश्चित वेळेइतके पैसे मिळतील.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Insurance-Plan/anand.aspx

हे पण वाचा :

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडिटी सोबत मिळवा डेली 2GB डेटा

Car : CNG-हायब्रिड इंजिनमध्ये काय फरक आहे??? अशा प्रकारे समजून घ्या

PIB FactCheck : SBI कडून महिलांना कोणत्याही गॅरेंटीशिवाय मिळेल ₹ 25 लाखांचे कर्ज, ‘या’ मेसेज मागील सत्यता तपासा

RBI कडून ‘या’ बँकेचे लायसन्स रद्द, आता खातेदारांच्या पैशांचे काय होणार ???

1 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करा Demat Account शी संबंधित ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकेल खाते !!!