दिव्यांग मतदारांसाठी २५० व्हीलचेअरर्स; सोलापूर महानगरपालिकेचा उपक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । येत्या २१ तारखेला संपूर्ण राज्यासह सोलापूर शहर मध्य, उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. याकरिता सोलापूर शहर प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानाला येणाऱ्या दिव्यांग मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून सोलापूर महानगरपालिकेकडून दिव्यांग मतदारांसाठी २५० व्हीलचेअर्सची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

सोलापूर शहरातील २३१ ठिकाणी ही व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध असणार आहे. त्याचा लाभ त्या त्या भागातील दिव्यांग मतदार घेऊ शकतील. दरम्यान या अगोदर लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा असा उपक्रम राबविण्यात आला होता. मात्र आता त्याचा अवाका वाढला असून, त्यामुळं दिव्यांग मतदारांना याची मदत होणार आहे. अशीही माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Leave a Comment