२६ वर्षांचा डाॅक्टर ते हिज्बुल कमांडर; जाणुन घ्या हे कसं झालं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आठवड्यात, बरीच झुंज दिल्यानंतर अखेर सुरक्षा दलांना हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नाईकूचा खात्मा करण्यात यश आले. बुरहान वानीनंतर नायकू हा काश्मीर खोऱ्यातील तरुणांसाठी पोस्टर बॉय बनला होता, दहशतवादी कारवायांमुळे त्याच्यवर १२ लाख रुपयांचे बक्षीस ही ठेवण्यात आले होते.याच नायकूच्या निर्मूलनानंतर आता गाझी याला हिज्बुलची कमांड मिळाली आहे. या दहशतवादी संघटनेचा नेता म्हणून निवडल्या गेलेल्या अवघ्या २६ वर्षांच्या या दहशतवाद्यात असे आहे तरी काय ? ते जाणून घेऊयात.

नायकूप्रमाणेच तोही काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील आहे. गाझी इथल्या मलंगपोरा गावात लहानाचा मोठा झाला, इतर मुलांप्रमाणेच त्यांचेही बालपण अगदी सामान्य होतं. पुलवामा येथून बायोमेडिकलमध्ये डिप्लोमा केल्यानंतर, गाझी श्रीनगरला आला आणि त्याने श्रीनगरमधीलच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी येथे तांत्रिक सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरवात केली. यावेळी त्याची भेट रियाज नायकूशी झाली.

येथूनच गाझीने कट्टरपंथाच्या मार्गावर जाण्यास सुरुवात केली. असा विश्वास आहे की यानंतर लवकरच त्याने आपले काम सोडले आणि पूर्णपणे दहशतवादाचा मार्ग स्वीकारला. नायकू याच्याप्रमाणेच तोही एक फुटीरतावादी आणि पाकिस्तानचा कट्टर समर्थक होता. काही दिवसातच गाझीने दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, कुलगाम आणि शोपियान जिल्ह्यांत दहशतवादाचा झेंडा फडकविला. तो येथील तरुणांना शिक्षण तसेच नोकरी सोडून कट्टरपंथाचा मार्ग अवलंबण्याचा सल्ला देत असत.

हिज्बुलमध्ये नवीन भरती करण्यासाठी आणि त्यांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीनेही गाझी खूप सक्रिय होता. हे लोक कमाईसाठी (terror-financing module) अफूची लागवड आणि तस्करीसारखी कामं करायचे. या कामांमध्येही हा तरुण गाझी सतत पुढे काम करत असायचा. लवकरच त्याला हिज्बुलमधील त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांपेक्षा अधिक मानाचे स्थान दिले जाऊ लागले. बरं, यामागे आणखी एक कारण होते ते म्हणजे कि त्याने आपल्या बायोमेडिकलच्या अभ्यासादरम्यान जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत प्रशिक्षणही घेतले होते. जे की जखमी दहशतवाद्यांच्या उपचारासाठी त्याचे हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरले होते.त्यामुळेच संघटनेची लोकं त्याला डॉ सैफ असे म्हणू लागले.

विशेष दहशतवादी अभियानासाठी जोमाने आणि रागाने भरलेल्या या नवीन भरती केलेल्या तरुणांना नायकूने प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण संपल्यानंतर गाझी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचताच त्याची दहशत तिथे लवकरच पसरली. यामुळेच त्याला काश्मीरमधील ‘ए ’ श्रेणी दहशतवाद्याचा दर्जा मिळाला आहे. दहशत पसरविण्याच्या प्रकाराने भारतीय सैन्य या दहशतवादी लोकांना अनेक श्रेणी मध्ये ठेवतात. या श्रेणी ए ++, ए + आणि ए या श्रेणी आहेत. यामध्ये ते दहशतवादी सामील आहेत, ज्यांच्या कृतीमुळे सर्वांमध्ये भरपूर दहशत पसरते.

त्याशिवाय येथे बी ++ आणि बी + श्रेणी देखील आहेत ज्यात तुलनेने किंचित कमी भयानक दहशतवाद्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त,आणखी एक श्रेणी देखील आहे, ज्यामध्ये नवीनच भरती केलेले युवक सहसा हिज्बुलमध्ये सामील झालेले आहेत असे येतात. तसेच, पुलवामा येथे सीआरपीएफच्या पथकावर हल्ला करणारा आदिल अहमद दार हा सी वर्ग दहशतवादी होता, ज्याचा कोणताही मोठा रेकॉर्ड नव्हता पण त्यानंतरही त्याने केलेल्या हल्ल्यात ४० भारतीय सैनिक ठार झाले होते.

भारतीय सैन्याबरोबरील चकमकीत नायकूच्या झालेल्या मृत्यूनंतर या हिज्बुल संघटनेने ६ मे रोजी शोकसभेचे आयोजन केले होते. त्याचबरोबर, गाझी हैदरला जम्मू-काश्मीरचा नवीन ऑपरेशनल चीफ कमांडर बनविण्याची घोषणा केली गेली. यासह २६ वर्षांचा हा दहशतवादीही आता भारतीय सैन्याच्या निशाण्यावर आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment