मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये ज्या प्रमाणे लोकल सेवेचे खूप मोठे योगदान आहे अगदी त्याच प्रमाणे मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये बेस्टचं देखील मोठ योगदान आहे. दररोज हजारो प्रवासी बेस्ट न प्रवास करत असतात. मात्र आता बेस्ट बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बेस्ट ला वेटलीज सर्विस देणाऱ्या एका कंपनीने एकाच वेळी एक दोन नाही तर तब्बल 262 बसेस सेवेतून मागे घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे शहरातील बेस्ट बस ची एकूण संख्या आता 3195 वरून 2933 वर पोहोचली आहे. त्यामुळे सहाजिकच याचा परिणाम बेस्टच्या प्रवाशांवर होणार आहे. मुंबईत प्रवाशांची मोठी गर्दी असल्यामुळे बेस्टचा प्रवासाला सुद्धा मुंबईकरांकडून प्राधान्य दिले जाते. मात्र अचानक 262 बस सेवेतून मागे घेतल्यामुळे सहाजिकच सध्या उपलब्ध असलेल्या बसेसना गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
‘या’ भागातील बस कमी
मुंबईमधल्या पश्चिम उपनगर म्हणजेच अंधेरी गोरेगाव जोगेश्वरी या भागातून धावणाऱ्या मिनी बस कमी झाल्यामुळे येथील प्रवाशांचा त्रास वाढणार आहे. सध्या परिस्थिती पाहता यातून मार्ग काढण्यासाठी बेस्ट कडून इथं सर्वसामान्यांसाठी सिंगल डेकर बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम बेस्टच्या मुख्य प्रवास मार्गावर पडला असून जिथे उपलब्ध असणाऱ्या बसची संख्या कमी झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झेलावा लागतोय.
याबाबत एका माध्यमाला माहिती देताना बेस्टचे महाप्रबंधक अनिल दिघीकर यांनी सांगितले की, कंत्राटदार अनेक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत त्यामुळे बस सेवा सुरू ठेवण्यात अडचणी येत आहेत या मुद्द्यावर सध्या चर्चा सुरू असून प्रवाशांची गैरसोय होणार नाही हा मुख्य हेतू असे माहिती दिग्गीकर यांनी दिली आहे.
बेस्टच्या ताब्यातील मिनी बस हटवण्यात आल्यामुळे जवळपास बाराशे चालक आणि बशीत देखभाल करणारे कर्मचारी बेरोजगारात झाले आहेत या कर्मचाऱ्यांच्या वतीने बेस्टच्या महाप्रबंधकांकडे एक अर्ज करण्यात आला असून त्यांच्यामध्ये श्रमिकांच्या नोकऱ्यांना सुरक्षितता देत कंत्राटदारांना सेवा पूर्ववत न केल्यास या कर्मचाऱ्यांना बेस्ट मध्ये समावेश करून घ्यावे अशी मागणी ही करण्यात आली आहे.