Sunday, January 29, 2023

औरंगाबाद शहरात 27 टक्के लसीकरण पूर्ण

- Advertisement -

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. यासाठी केंद्र शासनाने 16 जानेवारी 2019 पासून लसीकरणाला सुरुवात केली होती. औरंगाबादमध्ये दररोज 15 ते 20 हजार नागरिकांना लस देण्याची व्यवस्था मनपाने केली आहे. परंतु शासनाकडून हवी तेव्हा लस मिळत नसल्यामुळे काहीकाळ लसीकरण मोहीम बंद ठेवावी लागत आहे. यामध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण फक्त झिरो पॉईंट (0%) इतके आहे.

जानेवारी ते मार्च पर्यंत लसीकरणाला भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. परंतु कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे सोमवारपासून लसीकरण मोहीम थांबवण्यात आली होती. शहरात 18 वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरू झाल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. लस घेण्यासाठी नागरिक केंद्रावर सकाळ पासूनच नंबर लावत होते. दररोज 12 ते 17 हजार एवढे लसीकरण होत होते. एप्रिल महिन्यात लसीकरण केंद्राची संख्या वाढवण्यात आली होती.

- Advertisement -

शहरात आतापर्यत 4 लाख 46 हजार 132 नागरिकांचे लसीकरण झाले असून, पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या तीन लाख 47 हजार 58 तर दोन्ही डोस घेणारे 99 हजार 75 एवढे नागरिक आहेत. शहराची लोकसंख्या सुमारे 17 लाख रुपये धरण्यात येत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सरासरी 27 टक्के लसीकरण झाले आहे. शहरात लस वाया जाण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. लस घेणाऱ्यांची संख्या 10 असली तेव्हाच लसीकरण सुरु होते त्यामुळे लस वाया जाण्याचे कारण नाही असं नीता पाडळकर यांनी सांगितलं.