भारतात आता PUBG सहित सुमारे 275 चिनी अ‍ॅप्सवर घातली जाऊ शकते बंदी, सरकार करत आहे तपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर सरकार आता चीनमधील आणखी काही 275 अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची तयारी करत आहे. सरकार हे पहात आहे की हे अ‍ॅप्स कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा आणि युझर्सच्या गोपनीयतेसाठी धोका दर्शवित नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या कंपन्यांचे सर्व्हर चीनमध्ये आहेत त्यांना सर्वप्रथम थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या 275 अ‍ॅप्समध्ये चीनच्या बहुमूल्य इंटरनेट टेंन्सेंटचा भाग असलेल्या PUBG या गेमिंग अ‍ॅपचा समावेश आहे. यात Xiaomi -निर्मित Zili अ‍ॅप, ई-कॉमर्स Alibaba चा Aliexpress अ‍ॅप, Resso अ‍ॅप आणि Bytedance चा ULike अ‍ॅपचा देखील समावेष आहे. या डेवलपमेंट शी संबंधित व्यक्तीने सांगितले की सरकार या सर्व 275 अ‍ॅप्सवर किंवा यातील काही अ‍ॅप्सवर बंदी घालू शकते. मात्र, कोणताही दोष न आढळल्यास कोणत्याही अ‍ॅपवर बंदी घातली जाणार नाही.

या डेवलपमेंटशी संबंधित एका अधिकृत स्त्रोताने सांगितले की, चीनच्या या अ‍ॅप्सचा सातत्याने आढावा घेतला जात आहे आणि कोठून निधी मिळतो हे शोधण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, असे आढळून आले आहे की, काही अ‍ॅप्स हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहेत. तसेच, काही अ‍ॅप्स हे डेटा शेअरिंग आणि प्रायव्हसीच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत.

सरकार नियम बनवण्याच्या तयारीत आहे
रिपोर्ट नुसार भारत सरकार आता अ‍ॅप्ससाठी नियम बनवित आहे, जे सर्वांना लागू होतील आणि जर तसे झाले नाही तर त्या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा धोका असेल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की सरकारची ही एक मोठी योजना आहे, जेणेकरुन सायबर सुरक्षा अधिक बळकट होऊ शकेल आणि भारतीय नागरिकांचा डेटा सुरक्षित होईल. या नियम आणि मार्गदर्शक सूचनांमध्ये, अ‍ॅपला काय करावे आणि काय करू नये याबद्दल सांगितले जाईल.

काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने सर्वात लोकप्रिय असलेल्या टिकटॉकसह इतर 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. याशिवाय त्यामध्ये अलिबाबाचे UCWeb आणि UC न्यूज देखील होते. तसेच, शेअर इट आणि कॅमस्केनर सारख्या लोकप्रिय अ‍ॅप्स देखील यात उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment