28 कोरोना बधितांची नव्याने भर, एकाचा मृत्यू

corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | गेल्या 24 तासात जिल्ह्यात 28 नव्या कारोना रुग्णांची भर पडली. तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 10 तर ग्रामीण भागातील 18 रुग्णांचा समावेश आहे.

19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 238 रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मनपा हद्दीतील 10 रुग्ण आढळले असून भडकल गेट 1, सेवन हिल परिसर 1, बेगमपुरा 1, मामा चौक पद्मपुरा 1, 6 तर ग्रामीण हद्दीतील 18 रुग्ण आढळले.

यात गंगापूरच्या कन्नड 1, वैजापूर 8, पैठण तालुक्यातील पाच जणांचा समावेश आहे. याशिवाय घाटीत माळी भोगरगाव, वैजापूर येथील 55 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.