औरंगाबाद – जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानिमित्त २८ शिक्षकांचा आज ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी हॉलमध्ये सन्मान करण्यात येणार आहे. जि. प. अध्यक्षा मीना शेळके, शिक्षण सभापती अविनाश गलांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांच्या समितीने प्राथमिक शिक्षकांचे १६, माध्यमिकचे १ आणि विशेष पुरस्कारासाठी आलेले दोन अशा ४२ प्रस्तावांमधून पात्र शिक्षकांची निवड केली आहे.
जिल्हा परिषदेने प्राथमिकचे रोहिणी पिंपरखेडकर, कैलास जगताप, भारती सोळंके, भागिनाथ सरोवर, प्रदीप जाधव, शाहीन बेगम बशीर अहमद, अप्पाराव नलावडे, नितीन राजपूत, किशोर जगताप, माध्यमिकचे संदोष तुंबारे, सारिका जैन, प्रकाश सोनवणे, अविनाश पाटील, यशोधन चव्हाण, कौतिक सोनवणे, वत्तरसिंग परदेशी, कमलाकर पारधे आणि प्रमुलचंद पाटील यांची विशेष शिक्षक म्हणून निवड केली आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची संख्या लक्षात घेऊन व माध्यमिक विभागामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या शक्षकांनादेखील आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाईल. यामध्ये भाऊसाहेब भिसे, संगीता खरात, नितीन पाटील, शशिकांत बडगुजर, जावेद अन्सार शेख, माध्यमिकचे सुशीलदास वैष्णव, तुकाराम कुळधर, धनराज चव्हाण यांची नवड करण्यात आल्याचे शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी सांगितले .