Saturday, June 3, 2023

देशातील 29 टक्के कोरोनाग्रस्त दिल्लीतील निझामुद्दीन मरकझशी संबंधित- आरोग्य मंत्रालय

मुंबई । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील कोरोना संसर्गाच्या स्थितीबाबत माहिती देणारी आकडेवारी जाहीर करण्यात आली. आज दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत ही आकडेवारी सांगण्यात आली. आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 14 हजार 378 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4291 केसेस म्हणजे 29.8% पॉझिटिव्ह रुग्ण एकाच स्रोतापासून म्हणजे निझामुद्दीनमधील तबलीघी जमात मरकझशी समूहातून निर्माण झाले असल्याचे आढळले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

२३ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये तबलीघीचे रुग्ण आहेत. यातील ८४ टक्के रुग्ण तामिळनाडूत, दिल्लीत ६३ टक्के, ७९ टक्के तेलंगण, ५९ टक्के उत्तर प्रदेश आणि ६१ टक्के आंध्र प्रदेशात असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. देशातील करोना रुग्णांचा मृत्यू दर ३.३ टक्के इतका आहे. यात वयाच्या विभागणीनुसार वेगगेवळी टक्केवारी समोर आली आहे. ४५ वयापर्यंतच्या रुग्णांचे १४.४ टक्के, ४५ ते ६० वयाच्या रुग्णांचा १०.३ टक्के ६०-७५ वयोगाटातील रुग्णांचा ३३.१ टक्के आणि ७५ पेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णांचा मृत्यू दर हा ४२.२ टक्के इतका आहे.

देशातील काही भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत असल्याचा सकारात्मक ट्रेंड समोर आला आहे,अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. देशातील २३ राज्यांमधील ४७ जिल्ह्यांत गेल्या २८ दिवसांपासून करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. तर इतर ४५ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांपासून करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. हे असे जिल्हे आहेत जिथे सुरुवातीला करोनाचे रुग्ण आढळून आले होते. दरम्यान, गेल्या २४ तासात देशभरात ९९१ कोरोनाची लागण झालेले नवे रुग्ण आढळले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”