सांगली | शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात शुक्रवारी पहाटे 2 वाजून 22 मिनिटांच्या सुमारास 3. 4 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्र बिंदू वारणा धरणा पासून पश्चिमेला 200 किमी अंतरावर असुन, दरम्यान वारणावती येथील भूकंप मापन केंद्रावर त्याची तीव्रता नोंदली गेली आहे.
सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यातही भूकंपाचा साैम्य धक्का जाणवला आहे. त्याच बरोबर जम्मू काश्मीरमध्येही पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्रीची वेळ व धक्काही सौम्य स्वरूपाचा असल्याने परिसरात तो बर्यापैकी जाणवला. या भूकंपाच्या धक्यामुळे कोणतीही जिवीत अथवा वित्तहानी झाली नाही.
या भूकंपाच्या धक्क्यामुळे चांदोली धरणाला कोणतीच झळ पोहचली नाही. वाराणवती वारणा पाटबंधारे शाखा अभियंता गोरख पाटील यांनी स्पष्ट केले आहे. चांदोली धरणात रात्री झालेल्या भूकंपामुळे सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.