धक्कादायक ! मुलींची छेड काढल्याच्या आरोपावरून 3 मुलांना झाडाला बांधून केली मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बरेली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये परिसरातील मुलींची छेडछाड केल्याच्या आरोपाखाली बुधवारी रात्री तीन मुलांना स्थानिकांनी पकडले आणि त्यांना बेदम मारहाण केली. या मुलींच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हंटले कि “दुसऱ्या धर्मातील तीन मुले अनेकदा आमच्या वस्तीत येऊन आमच्या मुलींची छेड काढतात. काल रात्री माझी मुलगी घरी परतत असताना या मुलांनी तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली आणि तिला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली.

यानंतर पोलिसांनी या तीन तरुणांविरुद्ध SC/ST कायद्यासह IPC कलम 354 आणि 323 अंतर्गत एफआयआर दाखल केला. यानंतर या मुलांपैकी एका मुलाच्या आईच्या तक्रारीवरून दुसरा एफआयआर नोंदवण्यात आला, त्यात आरोप करण्यात आला कि तिचा मुलगा बाजारात होता तेव्हा मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या मुलाला पकडून अनेक तास मारहाण केली. या संबंधित एक व्हिडिओ समोर आला होता त्यामध्ये एक मुलगी मुलांना कानाखाली मारताना दिसत आहे.

यानंतर पोलिसांनी आयपीसीच्या कलम 147, 341, 323, 504 आणि 506 अन्वये चार ओळखीच्या आणि अनेक अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला.या शहराचे एसपी अखिलेश भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार एका स्थानिक मुलीचा विनयभंग केल्याबद्दल तीन मुलांना झाडाला बांधून अनेक तास मारहाण करण्यात आली. सर्व आरोपी आणि मुलगी प्रौढ आहेत. दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून आम्ही एफआयआर नोंदवला असून, आतापर्यंत तीन जणांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.”

Leave a Comment