कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत दिपावलीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर नविन गूळ विक्रीचा शुभारंभ झाला. पहिल्याच सौद्यात सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील शेतकऱ्याला पहिल्याच साैद्यात 3 हजार 801 रूपयांचा उंच्चाकी दर प्रति क्विंटलला मिळाला.
कराड बाजार समितीचे माजी उपसभापती विजयकुमार कदम, जयंतीलाल पटेल, जगन्नाथ लावंड, सचिव बी. डी. निंबाळकर यांच्या उपस्थितीत गुळ सौदा झाला. शिवाजी रामचंद्र पवार या अडत व्यापाऱ्यांच्या दुकानात साैदा झाला. पुढील साैदा 31 आॅक्टोंबर रोजी बाजार समितीतील शिवतेज ट्रेडींग कंपनी या अडत दुकानात गुळाचा सौदा होणार आहे.
पाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या सौद्यात 44 क्विंटल गुळाची विक्री होवुन गुळाला सरासरी तीन हजार 501 रुपये दर मिळाला. यावेळी कोल्हापुर, सांगली जिल्ह्यातील शेतकरी व व्यापारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी गुळ मार्केटला जास्तीत जास्त गूळ विक्रीस आणावा, असे आवाहन विजयकुमार कदम यांनी केले आहे.