परभणी : हॅलो महाराष्ट्र – होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) परभणी या संस्थेतर्फे आज 28 मार्च रोजी ‘बीड येथील इंफॅन्ट इंडिया ‘आनंदवन बालगृह’ पाली या एचआयव्ही संक्रमित बालकांच्या प्रकल्पातील मुलींसाठी 300 सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप केले. बीड येथे दत्ता बारगजे व सौ . संध्याताई बारगजे या 70 पेक्षा अधिक एचआयव्ही संक्रमित मुला मुलींचा इंफॅन्ट इंडिया हा निवासी प्रकल्प पाली जि.बीड ) येथे अत्यंत समर्पण व सेवा वृत्तीने कोणतेही शासकीय अनुदान न घेता चालवला जातो.
एचएआरसी संस्था नेहमीच अशा एचआयव्ही ग्रस्त अनाथ बालकांसाठी कार्य करणाऱ्या निवासी शासकीय संस्थांना मदत करत असते. सोमवार 28 मार्च रोजी समाजसेवक दत्ता बारगजे व संध्या बारगजे यांनी एचएआरसी पुरस्कृत स्वाध्यायशक्ती अभ्यासिकेत भेट देऊन एचएआरसी संस्थेचे कार्य जाणून घेऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी इंफॅन्ट इंडिया प्रकल्पातील 30 किशोरवयीन मुली 30 (13 ते 18 वयोगटातील) मुली व महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीतील स्वच्छतेच्या दृष्टीने एचएआरसी संस्थे तर्फे 10 महिने पुरतील इतके 300 सॅनिटरी पॅड व मासिक पाळी व्यवस्थापनच्या माहितीपत्रकचे दत्ता बारगजे व संध्या बारगजे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
येत्या काळात शाश्वत पर्याय म्हणून एचएआरसी संस्थे तर्फे ‘मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप’ या विषयावर इंफॅन्ट इंडिया बीड येथे कार्यशाळा घेऊन कप वापरण्यासाठी इच्छुक गरजू किशोरवयीन मुलींना मोफत मेन्स्ट्रुअल कपचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे ” संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक म्हणाले. या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी डॉ पवन चांडक, डॉ सौ आशा चांडक, अनुज भुतडा, राधिका भंडे, संदीप भंडे, गोपाळ मुरक्या यांनी प्रयत्न केले.