31st Night Party : 31 डिसेंबरच्या पार्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय!! हॉटेल्स, बार कधीपर्यंत सुरु राहणार?

31st Night Party
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन 31st Night Party । २०२५ हे वर्ष संपत आलं असून सर्वजण नवीन वर्षाची आतुरनेते वाट बघत आहेत. नवीन विरहाच्या स्वागतापूर्वी ३१ डिसेम्बर रोजी सर्वच जण पार्ट्या करतात. दारू पिणाऱ्या तळीरामांसाठी ३१ डिसेंबरचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने एन्जॉय करण्याचा दिवस मानला जातो. आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारने थर्टी फर्स्टनिमित्त मोठा निर्णय घेतलाय. 31 डिसेंबर रोजी राज्यातील रेस्टॉरंट्स, रेस्टोबार आणि पब्स सकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आत्तापासूनच सगळीकडे जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळतेय.

नाताळ आणि 31 डिसेंबरनिमित्त मद्यविक्री आणि बिअर बार उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास सवलत देण्यात आली आहे. मद्यविक्रीची दुकानं रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सवलत आहे. तर पोलीस आयुक्तालये असणाऱ्या हद्दीत बिअर बार आणि इतर आस्थापनांना पहाटे 5 पर्यंत दुकानं सुरू राहतील. हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत एक निवेदन दिले होते, संघटनेने पर्यटन, रोजगार आणि आर्थिक उलाढालीच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे हॉटेल चालकांना गर्दीचे योग्य नियोजन करणे आणि ग्राहकांना अधिक वेळ देणे शक्य होणार आहे. 31st Night Party

कोणती दुकाने किती वाजेपर्यंत सुरु राहणार ? 31st Night Party

एफएल- 2 (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचं दुकान) रात्री 10.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी

उच्च दर्जाची आणि अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेली एफएल- 2 ला रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत परवानगी

एफएलडब्ल्यू 2 आणि एफएलबीआर 2 ला रात्री 10.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत मंजुरी

एफएल 3 (परवाना कक्ष) आणि एफएल 4 (क्लब अनुज्ञप्ती) यांना पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 1.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत आणि पोलीस आयुक्तालयच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत मंजुरी आहे.

नमुना ई (बीअर बार) आणि ई-2 यांना मध्यरात्री 12 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत परवानगी

सीएल 3 ला महानगरपालिका तसंच ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत आणि इतर ठिकाणी रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत मंजुरी आहे.