भिवंडीमध्ये 33 वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – भिवंडीमध्ये एक मोठी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये ठाण्यात कामगार पुरवणाऱ्या दोघांमधील वाद विकोपाला जाऊन एका तरुणाची हत्या (shot dead) करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र काल त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू (shot dead) झाला. गणेश कोकाटे असे हत्या करण्यात आलेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

काय घडले नेमके?
ठाणे येथील लोढामध्ये काम पुरवण्याच्या कामावरुन गणेश कोकाटे आणि गणेश इंदुलकर यांच्यात वाद होता. या घटनेच्या अगोदरदेखील गणेश कोकाटे यावर गणेश इंदुलकर याने गोळीबार (shot dead) केला होता. गणेश कोकाटे त्यातून थोडक्यात बचावला होता. या प्रकरणी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास करत चार जणांना अटक केली होती.

घटनेच्या दिवशी संध्याकाळी गणेश कोकाटे ठाणे येथून कशेळी येथील घरी जात असताना त्याच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. दुचाकीवरुन आलेल्या आरोपीने गणेश कोकाटे याच्यावर गोळ्या (shot dead) झाडल्या आणि तो घटनास्थळावरून फरार झाला. या गोळीबारामध्ये गणेश कोकाटे हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. व्यावसायिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. गणेश कोकाटेच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी एकूण 3 पथकं तैनात करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली आहे. लवकरच आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल असेदेखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ म्हणाले आहेत.

Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या