Saturday, June 3, 2023

Savings Account : मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Savings Account : कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील आर्थिक कामांची पहिली पायरी म्हणजे बँकांचे बचत खाते ही मानले जाते. यामध्ये पैसे सुरक्षित राहण्याबरोबरच चांगला रिटर्न देखील मिळतो. मात्र तो अत्यंत कमी दराने दिला जातो. बचत खात्याचा सर्वात मोठा फायदा असा कि, यामध्ये आपल्याला सहजपणे पैसे जमा करता किंवा काढता येतात.

बचत खाते हे खूपच उपयुक्त आणि फायदेशीर आहे. आजकाल बहुतेक कुटुंबातील जवळपास प्रत्येकाकडे बचत खाते आहे. तसेच बचत खाते (Savings Account) नसलेली व्यक्ती सध्याच्या काळात शोधूनही सापडणार नाही असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. सध्या बँकादेखील बचत खात्यांसाठी अनेक ऑफर्स देत आहेत. अशातच आता लहान मुलांसाठी देखील बचत खाती उघडली जात आहेत. मात्र, मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे आणि ते उघडण्याची योग्य वेळ कोणती याबाबत आपल्याला माहिती आहे का ??? चला तर मग आज त्याविषयी जाणून घेउयात…

Different Types of Savings Account in India | IDFC FIRST Bank

आर्थिक जगातली पहिली पायरी

आपल्या दररोजच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक कामांसाठी आपल्याकडे बचत खाते (Savings Account) असणे महत्वाचे ठरते. आर्थिक जगातली ही पहिली पायरी मानली जाते. तसेच आजकाल कोणतेही बँकिंग ट्रान्सझॅक्शन करण्यासाठी आपल्याकडे बचत खाते आवश्यक बनले आहे. त्यामुळे जर लहानपणापासूनच मुलांसाठी बचत खाते सुरु केले गेल्यास त्यांना या खात्याविषयीच्या सर्व गोष्टी लवकरच समजू शकतील. त्याचप्रमाणे आपले स्वत:चे खाते वापरल्याने मुलांना पैशांची बचत करण्याची लवकर सवय देखील लागू शकेल. तसेच याद्वारे मुलेही बँकिंगशी संबंधित कामे लवकर करायला शिकू शकतील, जे गरजेच्या वेळी फार उपयोगी ठरेल.

Savings account tip: Can't maintain bank's minimum balance? Do this to avoid fine - BusinessToday

मुलांसाठी स्वतंत्र बचत खाते असण्याचे फायदे

सुरुवातीला पालकांच्या देखरेखीखाली मुलांना बचत खाते (Savings Account) वापरता येईल. त्याच वेळी, मुलांसाठी स्वतंत्रपणे बचत करण्याचा हा एक चांगला मार्ग ठरू शकेल. यासाठी बँकांकडून दोन कॅटेगिरी देण्यात येतात, ज्यामध्ये 10 वर्षांखालील मुलांचा पहिल्या कॅटेगिरीमध्ये तर 10 ते 18 वर्षांच्या मुलांचा दुसऱ्या कॅटेगिरीमध्ये समावेश केला जातो. यामध्ये 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांची खाती पालकांद्वारे जॉईंट पद्धतीने वापरली जातील. याद्वारे मुलांना बँकिंग शिकवण्यात मदत होईल.

Savings Account | Open Bank Account Online With Best Interest Rates

मुलांचे बचत खाते कधी उघडावे ???

स्वतःचे बँक खाते असेल तर याद्वारे मुलांना बचत करण्यास प्रवृत्त करता येईल. ज्यामुळे त्यांना लवकरात लवकर आर्थिक शिस्त शिकण्यास मदत होईल. तसेच बचत खात्यामध्ये जमा केलेल्या रकमेवर बँकेकडून रिटर्नही दिला जाईल. जेव्हा मुले आपले बचत केलेल्या पैशांमध्ये वाढ होताना पाहतील, तेव्हा ते आणखी बचत करण्यास प्रवृत्त होऊ शकतील. ज्यामुळे जेव्हा मुले शाळेत जायला लागतील तेव्हापासूनच त्यांच्यासाठी बचत खाते (Savings Account) उघडता येतील.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/accounts/saving-account

हे पण वाचा :
Insurance Schemes : ‘या’ सरकारी विमा योजनांच्या प्रीमियममध्ये वाढ, आता भरावे लागणार जास्त पैसे
Axis Bank देखील FD वर देणार जास्त व्याज, जाणून घ्या नवीन व्याजदर
Train Cancelled : रेल्वेकडून आज 350 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
Vi च्या प्लॅनमध्ये वर्षभराच्या व्हॅलिडिटीसहीत मिळतील ‘हे’ अतिरिक्त फायदे