गलवान खोऱ्यांत चीनचे ३५ सैनिक ठार; अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये १५-१६ जूनच्या रात्री लडाखच्या Galwan Valley गलवान खोऱ्यात अतिशय हिंसक झडप झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले पण चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. चीनने अजूनपर्यंत हे मान्य केले नसले तरी यूएस न्यूज वेबसाइटने या संघर्षात ३५ चिनी सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे. यामध्ये एका वरिष्ठ चिनी सैन्य अधिकाऱ्याचा सुद्धा समावेश असल्याचे म्हटलं आहे.

अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने यूएस न्यूज वेबसाइटने हे वृत्त दिले आहे. अमेरिकेच्या विश्लेषणानुसार, आपले सैनिक मारले गेले हे चीन मान्य करणार नाही कारण ते हा आपल्या सैन्यदलाचा अपमान समजतात. दरम्यान, एएनआयने ४३ चिनी सैनिक या संघर्षात ठार झाल्याचे म्हटले आहे. चीन आणि भारतामध्ये ही झडप ज्या ठिकाणी झाली त्या भागांमध्ये चीनच्या सैन्याच्या हॅलिकॉ़प्टर्सच्या वाढलेल्या फेऱ्या पाहून शेजारी राष्ट्राचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं स्पष्ट होत आहे. दोन्ही सैन्यांमध्ये झालेली हिंसक झडप पाहता यामध्ये चीनच्या सैन्यातील अनेक जवान जखमी झाले. ज्यांना त्या भागात तयार करण्या आलेल्या वाटेनं स्ट्रेचर, रुग्णवाहिकांच्या सहाय्यानं आणि हॅलिक़ॉप्टरच्या माध्यमातून बाहेर काढण्याच आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार १५ जूनच्या रात्री उशिरा गलवान खोऱ्यात ही घटना घडली होती. ज्यामध्ये दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांचं नुकसान झाल्याची माहितीही त्यांनी दिली. इतकंच नव्हे तर, चीनच्या सैन्यातील मारल्या गेलेल्यांची संख्या ही जास्त असल्याचंही म्हटलं जात आहे. पण, अधिकृत आकडा मात्र अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment