बेजाबदार मीडिया हाऊसेस विरोधात सलमान ,शाहरुख आणि आमिर सहित 38 प्रॉडक्शन हाऊस कोर्टात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टात धाव घेतली आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससेससह ३४ प्रॉडक्शन हाऊसेसनी याचिका दाखल केली आहे.

दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचे निधन झाल्यानंतर टीव्ही वृत्तवाहिन्यांनी सतत “अपमानजनक आणि बदनामीकारक” शब्द वापरन बॉलीवूड ला लक्ष्य केले होते.

गेल्या दोन महिन्यात बॉलिवूडची प्रतिमा मलीन करण्याचं काम या सगळ्यांनी केल्याची तक्रार या याचिकेत करण्यात आली आहे. या सगळ्यांविरोधात या प्रॉडक्शन हाऊसेसनी बेजबाबदार बातमीदारीचा ठपका ठेवला आहे. बॉलिवूडविषयी बर्‍याच मीडिया रिपोर्ट्सने बरेच काही सांगितले होते. विशेषत: ड्रग्जच्या तपासणी दरम्यान बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना यात जोडले गेले होते आणि बॉलिवूडचे वर्णन अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न केला होता जेथे ड्रग्जसारख्या वाईट गोष्टींचे वर्चस्व आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment