जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत साडेचार टक्के वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत साडेचार टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. धरणात सध्या 1 हजार 585 क्‍यूसेसने जल उद्योग दाखल झाले होते. शुक्रवारी सायंकाळी या जलाशयात 35. 69 टक्के पाणी साठ्याची नोंद झाली आहे. जायकवाडी प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी प्रशांत जाधव यांनी दिली आहे.

गेल्या महिनाभरापासून नाशिक परिसरात अपेक्षित पाऊस झाला नाही. मात्र या कालावधीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू राहिल्याने जायकवाडी धरणात संथगतीने पाण्याची आवक सुरू राहिली. या कालावधीत धरणात तब्बल साडेचार टक्के म्हणजेच 4.50 टीएमसी पाण्याची नव्याने भर पडली. 1522 फूट जल साठवण क्षमता असलेल्या या जलाशयात शुक्रवारी 1507.59 फूट पाणीसाठा नोंदवला गेला आहे. मीटर मध्ये हे प्रमाण 459.514 इतके असून एकूण पाणीसाठा 1513.055 दलघमी तर जिवंत पाणी साठण्याचे प्रमाण 774.949 दलघमी एवढे आहे .

पाणी पातळी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता ज्ञानदेव शिरसाट शाखा अभियंता विजय काकडे, गणेश खराडकर, बंडू अंधारे, अनिकेत बबनराव बोधने, रामनाथ तांबे आदी अधिकारी व कर्मचारी पाणीपातळी वर लक्ष देऊन आहे. गेल्या दोन वर्षापासून जायकवाडी धरण 100% भरत आहे गेल्यावर्षी वरील भागातून पाणी सातत्याने आवक होत राहिल्याने धरणाच्या इतिहासात होईल असे चौसष्ट दिवस धरणाचे दरवाजे खुले करून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

Leave a Comment