हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : फिक्स्ड डिपॉझिट्स हा गुंतवणुकीचा पारंपारिक पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला गॅरेंटेड रिटर्न बरोबरच सुरक्षितताही मिळते. RBI ने रेपो दरात आतापर्यन्त चार वेळा वाढ केली आहे. ज्यामुळे बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट्स करणाऱ्या ग्राहकांना चांगलाच फायदा होतो आहे. कारण रेपो दरात वाढ झाल्यापासून बँका FD वरील व्याजदरात वाढ करत आहेत. हे लक्षात घ्या कि, बहुतेक बँका ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांपेक्षा 50 bps किंवा 0.50 टक्के जास्त व्याज देतात. चला तर मग आज आपण ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर देणाऱ्या बँकांबाबत जाणून घेउयात…
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडून 999 दिवसांच्या FD वर सर्वसामान्यांना 8.01 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.26 टक्के व्याजदर देत आहे. अलीकडेच बँकेने FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. 2 नोव्हेंबर 2022 पासून बँकेचे नवीन दर लागू झाले आहेत. FD Rates
AU स्मॉल फायनान्स बँकेकडून 2 वर्षे ते 3 वर्षे आणि 3 वर्षे ते 45 महिन्यांच्या मुदतीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 8% व्याज मिळते. 10 ऑक्टोबर 2022 पासून हे व्याजदर लागू झाले आहेत. FD Rates
बंधन बँकेच्या ग्राहकांना आता 600 दिवसांच्या कालावधीसाठी FD वर 7.5% पर्यंत जास्त व्याजदर मिळतो. तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना 0.50% किंवा 50 bps जास्त मिळू शकतात. म्हणजेच त्यांना 600 दिवसांच्या FD साठी 8% पर्यंत रिटर्न मिळेल. FD Rates
युनिटी स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांच्या FD वर 8.3% पर्यंतचा व्याज दर देत आहे. तसेच हा व्याजदर 1 वर्ष 1 दिवसाच्या FD वर उपलब्ध असेल. आता बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 2 वर्षे ते 3 वर्षे आणि 3 वर्षे ते 5 वर्षे मुदतीच्या FD वर 8.15% व्याजदर मिळेल. FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.aubank.in/personal-banking/term-deposits/fixed-deposits/interest-rates
हे पण वाचा :
HDFC Bank ने ग्राहकांना दिला धक्का !!! आता EMI साठी मोजावे लागणार जास्त पैसे
Redmi Clearance Sale : फक्त 4,499 रुपयांमध्ये घरी आणा Redmi चा ‘हा’ पॉवरफुल फोन
Multibagger Stock : सॉक्स बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 3 पट नफा !!!
Bandhan Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!!! FD वर मिळणार 8% पर्यंत व्याज
Aadhar Card मधील माहिती अपडेट करण्यासाठी किती खर्च येतो हे जाणून घ्या