केरळमध्ये मान्सून यायला ४ दिवस उशीर; ‘या’ कारणामुळे यंदा पाऊस होणार लेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नैऋत्य मान्सूनची प्रतीक्षा आता सुरू झाली आहे. दरम्यान, यावर्षी मान्सूनला केरळमध्ये यायला चार दिवस उशीर होऊ शकेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली आहे. याबाबत माहिती देताना हवामान खात्याने शुक्रवारी सांगितले की, केरळमध्ये नैऋत्य मान्सूनची सुरूवात यंदाच्या १ जूनच्या तारखेपासून थोड्या वेळानंतर होण्याची शक्यता आहे. यावर्षी ५ जूनपासून केरळमध्ये मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

गेल्या १५ वर्षात हवामान खात्याचा अंदाज अचूक होता
केरळमध्ये मान्सूनच्या आगमनानंतर, देशात चार महिन्यांचा अधिकृतपणे पावसाळा सुरू होईल. यासह हवामान खात्याने असेही म्हटले आहे की २०१५ वगळता मागील १५ वर्षांत त्याचे अंदाज गाडगी अचूक असल्याचे सिद्ध झाले आहेत. गेल्या वर्षी ८ जून रोजी मान्सून हा केरळमध्ये पोहोचला होता. त्यावेळी हवामान खात्याने ६ जूनचा अंदाज जाहीर केला होता. २०१८ मध्ये २९ मे चा अंदाज करण्यात आला होता आणि मान्सून २९ मे रोजीच आला होता. २०१७ मध्ये ३० मेचा अंदाज केलेला होता आणि त्यावेळीही मान्सून ३० मे रोजीच पोहोचला होता. २०१६ मध्ये ७ जूनचा अंदाज जाहीर झाला होता आणि ८ जूनला मान्सून पोहोचला. या व्यतिरिक्त २०१५ मध्ये हवामान खात्याने ३० मे रोजी मान्सून येण्याची अपेक्षा केली होती, परंतु मान्सून हा थोड्या उशिराने ५ जूनला केरळमध्ये पोहोचला.

अंदमान निकोबारमध्ये मान्सून कधी येईल?
यापूर्वी हवामान खात्याने सांगितले की, शनिवारी नैऋत्य मान्सून हा अंदमान आणि निकोबार बेटांवर,तसेच बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार नैऋत्य मान्सून अनेकदा अंदमान आणि निकोबार बेटांवर तसेच बंगालच्या उपसागरात २० मे पर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर तो केरळमध्ये १० ते १२ दिवसांत पोहोचतो. धान्य, खडबडीत धान्ये, डाळी आणि तेलबिया या खरीप पिकांच्या पेरणीसाठी नैऋत्य मान्सून महत्त्वपूर्ण मानला जातो.

या राज्यात मान्सूनला उशीर होईल
या वर्षापासून, विभागाने १९६०-२०१९ च्या आकडेवारीच्या आधारे देशाच्या बर्‍याच भागांमध्ये मान्सून सुरू होण्याच्या आणि परत येण्याच्या तारखांमध्येही बदल केला आहे. पूर्वीच्या तारखा १९०१ आणि १९४० मधील डेटावर आधारित होते. इतर राज्यांविषयी बोलायचे झाल्यास महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून सामान्य तारखांच्या तुलनेत ३ ते ७ दिवस उशीरा येईल.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment