कोल्हापूरमध्ये तिहेरी अपघात! बंद पडलेल्या कंटेनरला कारची तर अपघातग्रस्त कारला ट्रकची धडक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापुरमध्ये एक विचित्र अपघात (accident) घडला आहे. या अपघातामध्ये (accident) चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत बंद पडलेल्या कंटेनरला एका कारने मागून धडक दिली. यानंतर अपघातग्रस्त कारला एका ट्रकने मागून धडक दिली. ही घटना इतकी भयंकर होती की या तिहेरी अपघातात (accident) चार जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत व्यक्तींमध्ये 11 वर्षीय मुलीचाही समावेश आहे.

काय घडले नेमके ?
आज पहाटे हा अपघात (accident) घडला. एक्सेल तुटल्याने महामार्गावर उभा असलेल्या ट्रकला महिंद्रा कार जाऊन धडकली तर कारच्या मागून येणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रकही अपघातग्रस्त (accident) कारला मागून धडकला. या विचित्र अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून कारमधील तिघे जागीच ठार झाले तर एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत सर्व बंगळुरू येथील एकाच कुटुंबातील आहेत.

या अपघातानंतरचे (accident) घटनास्थळावरील काही व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये अपघातग्रस्त कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. या भीषण अपघातात चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. 4-5 दिवसांपूर्वीदेखील कोल्हापूरमध्ये असाच एक भीषण अपघात (accident) झाला होता. यामध्ये मोटारसायकल आणि कंटनेरचा गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर हुनगीनहाळजवळ भीषण अपघात झाला होता. यात 25 वर्षीय डॉक्टर तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता.

हे पण वाचा :
Share Market ची वाटचाल पुढील आठवड्यात कशी असेल ???

Toyota ची Urbun Cruiser Hyryder लॉन्च; सेल्फ चार्जिंगचे दमदार फीचर्स

Yes Bank चे कर्ज महागले, बँकेकडून MCLR मध्ये करण्यात आली वाढ !!!

साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी घालून खून : आरोपी फरार

गेल्या आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

Leave a Comment