सातारा | सातारा जिल्हा परिषदेकडील हातपंप देखभाल व दुरुस्ती कक्षाकडील 4 वाहनांचे आयुष्यमान पुर्ण झाल्यामुळे हातपंप व विजपंप देखभाल व दुरुस्ती कामांमध्ये अडचणी निर्माण होत होत्या. त्याकरीता जिल्हा परिषदमार्फत नविन 4 महिंद्रा बोलेरो कॅम्पर वाहने खरेदी करणेत आली आहेत. या वाहनांचे आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांचे हस्ते पुजन करण्यात आले.
सातारा जिल्हा परिषदेकडील ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत देखभाल व दुरुस्ती कक्षामार्फत जिल्हयातील ग्रामीण भागातील हातपंप व विजपंपाची संबधित ग्रामपंचायतीकडून वार्षिक वर्गणी घेऊन देखभाल व दुरुस्ती करणेत येते. जिल्हयामध्ये एकूण 12 दुरुस्ती पथके मंजूर असुन पैकी 4 वाहनांचे आयुष्यमान 20 वर्षा पेक्षा जास्त् झाले असल्याने हातपंप विजपंप दुरुस्ती कामामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. त्याकरीता जिल्हा परिषदेमार्फत देखभाल दुरुस्ती निधी मध्ये विशेष तरतुद करुन नविन 4 महिंद्रा बोलेरो कॅम्पर वाहने खरेदी करणेत आलेली आहेत.
नवीन वाहनांचा दुरुस्ती पथकांमध्ये समावेश झाल्याने हातपंप व विजपंप देखभाल व दुरुस्तीचे काम सुलभ होणार आहे. त्यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सुनिल शिंदे, उप अभियंता (यां) देखभाल व दुरुस्ती कक्ष संदीप भुसे हे उपस्थित होते.