हिवाळ्यात घ्या फिरण्याचा आनंद; महाराष्ट्रातील ही 4 पर्यटनस्थळे ठरतील बेस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळ्याच्या ( Winter Season ) थंडगार दिवसांत महाराष्ट्रातील काही ठिकाणे प्रवासासाठी सर्वोत्तम मानली जातात. शांतता, निसर्गाचे सौंदर्य, आणि थंड हवामानाचा आनंद घेण्यासाठी प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकणी फिरत असतात. अशा भटकंती करणाऱ्या प्रवाशांसाठी आज आम्ही अशी ठिकाणे सांगणार आहोत , ज्यामुळे तुमचा आनंद दुप्पट होणार आहे. तर चला जाणून घेऊयात ती कोणती ठिकाणे आहेत .

माथेरान –

माथेरान हे आशियातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे, जे पर्यटकांना शुद्ध हवा आणि निसर्गाच्या अप्रतिम सान्निध्यात रमण्याची अनोखी संधी मिळते . येथील पॅनोरमा पॉईंट आणि इको पॉईंट हे दोन प्रमुख ठिकाणे आहेत, जिथून पर्यटकांना चित्तथरारक दृश्यांचा आनंद घेता येतो. माथेरानमध्ये घोडेसवारी आणि पायी फेरफटका यांसारख्या साहसी क्रियांचा अनुभव घेण्याचीही संधी आहे. हे सुंदर ठिकाण निसर्गप्रेमींना आणि साहस प्रेमींना आकर्षित करते, कारण ते एक शांतीपूर्ण आणि निसर्गाच्या गाभ्यात हरवलेले ठिकाण आहे.

नाशिक –

हे आध्यात्मिक शहर आणि भारताची वाइन राजधानी म्हणून ओळखले जाते, इथं थंड हवामानात अनेक प्रवास स्थळांचा अनुभव घेतला येतो . या शहरातील प्रमुख आकर्षणांमध्ये सुला वाइनयार्ड आहे, जिथे पर्यटक वाइनचा आणि द्राक्षमळ्यांचे सुमधुर भ्रमण करण्याचा आनंद घेतात. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर ( Trimbakeshwar Jyotirling Mandir) हे नाशिकमधील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे, जे अनेक भाविकांचे आकर्षण केंद्र आहे. त्याचसोबत नाशिकच्या अंजनेरी डोंगरावर ट्रेकिंग करण्याची संधीही पर्यटकांना साहसी अनुभव प्रदान करते. या शहराच्या निसर्गदृष्ट्या समृद्ध आणि आध्यात्मिक वातावरणात प्रवास करणाऱ्यांना एक अद्वितीय अनुभव मिळतो.

पाचगणी –

पाचगणी टेबललँड आणि गोड स्ट्रॉबेरी शेतीसाठी प्रसिद्ध असून , थंड हवामानाचा अनुभव घेण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. येथील प्रमुख आकर्षणांमध्ये सिडनी पॉईंट आणि पारशी पॉईंट ( parsi point ) यांचा समावेश आहे, जिथून डोंगराळ प्रदेशाचे सुरेख दृश्य पाहता येते. पाचगणीत मप्रो गार्डनमध्ये ताजे जॅम्स आणि आइस्क्रीमचा आनंद घेता येतो, जे पर्यटकांसाठी एक विशेष अनुभव असतो. साहस प्रेमींसाठी पॅराग्लायडिंग देखील एक रोमांचक आकर्षण आहे, जेथून पाचगणीच्या सुंदर निसर्गाचा हवाईदृष्ट्या आनंद घेतला जातो. या ठिकाणी निसर्गाची शांतता आणि साहसी अनुभवांचा उत्तम संगम आहे.

महाबळेश्वर –

महाबळेश्वर, स्ट्रॉबेरीच्या बागा आणि हिरव्यागार दऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. ते हिवाळ्यात निसर्गप्रेमींसाठी एक खास आकर्षण आहे. येथील वेण्णा लेक (venna lake) हे एक लोकप्रिय स्थळ आहे, जिथे पर्यटक बोटिंगचा अनुभव घेऊ शकतात. महाबळेश्वरमध्ये असलेला प्राचीन प्रातपगड किल्ला देखील इतिहासप्रेमींचा आकर्षण ठरतो. आर्थर सीटवरून दिसणारे विलोभनीय दृश्ये पर्यटकांना चांगलेच मोहित करतात, ज्यातून आसपासच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला जातो. या ठिकाणी निसर्गाच्या विविध रंगांचा अनुभव घेता येतो, जे महाबळेश्वरला एक अनोखं आकर्षण बनवतात.