महावितरणचा अजब कारभार! जोडणी न देताच शेतकऱ्याला दिले 40 हजारांचे वीजबिल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील घायगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कृष्णा रुस्तुम धने यांना कोटेशन भरून नऊ वर्ष झाले. मात्र वीज जोडणी मिळाली नाही. त्यात महावितरणचा कहर म्हणजे सदर शेतकऱ्याला 40 हजारांचे वीज बिल दिले आहे. महावितरणने हा प्रकार केवळ धने यांच्याबाबतीतच केलेला नसून तालुक्‍यातील सहा हजार जण या भोंगळ कारभाराचे चटके सहन करत असल्याचे समोर आले आहे.

वैजापूर तालुक्यातील घायगाव येथील शेतकरी कृष्णा धने यांची गट नंबर 126 मध्ये शेती आहे. जवाहर रोजगार योजनेअंतर्गत शासनाच्या निधीतून 2008 साली त्यांनी या शेतात विहीर खोदली. त्यानंतर त्यांनी वीज जोडणीसाठी 5 हजार 300 रुपये इतके कोटेशन 2013 सालि भरले. मात्र त्यांना अद्याप पर्यंत जोडणी देण्यात आलेली नाही. गेल्या नऊ वर्षापासून ते सतत महावितरण कार्यालयात चकरा मारत आहेत. पर्याय नसल्याने तेव्हापासून डिझेल पंपाचा पाणी उपसण्याकरिता वापर करत आहेत. यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनाही निवेदन पाठवले मात्र दखल घेतली गेली नाही. शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून वीजजोडणी देण्याची विनंती केली. त्यानंतर याचे वृत्त प्रकाशित झाल्याने संबंधित विभागाची सारवासारव सुरू झाली.

त्यातच सदर शेतकऱ्याला 40 हजार रुपयांचे वीज देण्यात आल्याची घटना ही समोर आली आहे. धने हे आकडे टाकून वीज वापरत असल्याचा जावईशोध लावून सदर बिल देण्यात आल्याचे महावितरणकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे एकटे धनेच नाही तर वैजापुर तालुक्यातील सहा हजार शेतकऱ्यांनाही हा त्रास सहन करावा लागत आहे.

Leave a Comment