राज्यातील 40 हजार शिक्षकांची भरती होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. सध्या राज्यातील अंदाजे 40 हजार शिक्षकांची पदं रिक्त असून ही पदं भरण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन १५ सप्टेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात होणार आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! शिक्षकांच्या 40 हजार पदांसाठी भरती लवकरच

शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन गेल्या दोन वर्षांत झाले नव्हते. सन २०१८-१९ नंतर आता परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी सात लाख प्रशिक्षार्थी ही परीक्षा देत असतात. परंतु गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी टिईटी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे गुणवंत व कार्यक्षम शिक्षक निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध होणाऱ्या रिक्त जागांसाठी या परीक्षेमुळे फायदा होणार आहे.

दरम्यान राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदं रिक्त असम शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे

Leave a Comment