माण- खटावमधील रस्त्यांसाठी 43 कोटींचा निधी : आ. जयकुमार गोरेंचे प्रयत्नांना यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
माण – खटाव विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या 9 रस्त्यांच्या कामांसाठी आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून तब्बल 42 कोटी 71 लाख 68 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याने दळणवळण सुलभ होणार आहे. माण तालुक्यातील दहिवडी – तुपेवाडी ते शिंदी बुदृक रस्त्यासाठी 4 कोटी सात लाख, सोकासन ते मोही रस्त्यासाठी 4 कोटी चौदा लाख, खडकी ते शंभूखेड रस्ता करणेसाठी 4 कोटी पाच लाख, वावरहिरे, डंगीरेवाडी ते मार्डी रस्त्यासाठी 8 कोटी साठ लाख, राणंद ते गोंदवले खुर्द रस्त्यासाठी 6 कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

खटाव तालुक्यातील घाडगे वस्ती, निमसोड ते कदम वस्ती रस्त्यासाठी 3 कोटी सत्तावन लाख, वाकेश्वर ते कुरोली रस्त्याच्या कामासाठी 4 कोटी दहा लाख, अनफळे, कानकात्रे ते पडळ रस्त्यासाठी 4 कोटी साडेसतरा लाख आणि मायणी ते मरडवाक रस्त्यासाठी 3 कोटी साठ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मतदारसंघातील माण आणि खटाव तालुक्यातील रस्त्यांसाठी आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून एकूण 42 कोटी 71 लाख 68 हजार रुपये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाले आहेत.

आमदार झाल्यापासून गेल्या 14 वर्षात जयकुमार गोरे यांनी मतदारसंघातील मोठी गावे आणि वाड्या वस्त्या जोडणाऱ्या रस्त्यांची कामे करण्यावर भर दिला आहे. एकाच वेळी 90 गावांमधील अंतर्गत रस्त्यांसाठी लागणारा निधी त्यांनी खेचून आणला होता. दुर्गम अशी ओळख असणाऱ्या माण आणि खटाव तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात आ. गोरेंना चांगलेच यश आले आहे.