‘कृष्णा’चे ४४ शेतकरी ज्ञानयाग प्रशिक्षणासाठी रवाना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ४४ शेतकरी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे यांच्यावतीने आयोजित केलेल्या ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी शिबीरात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. दरवर्षी शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे प्रतिएकरी उत्पादनवाढीसाठी शेतकर्‍यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटतर्फे प्रशिक्षण दिले जाते.

कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील ४४ शेतकर्‍यांना या शिबीरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रशिक्षणास जाणाऱ्या सभासद शेतकऱ्यांशी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ.अतुल भोसले यांनी संवाद साधला. यावेळी संचालक संजय पाटील, धोंडीराम जाधव, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, वसंतराव शिंदे, विलास भंडारे, सयाजी यादव, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, माजी पंचायत समिती सदस्य संजय पवार, सेक्रेटरी मुकेश पवार, खुबीचे माजी सरपंच कुबेर माने, संदीप माने, माजी उपसरपंच शंकर निकम, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील यांनी सहभागी आहेत.

शिबीरात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा संपूर्ण खर्च कारखान्याच्यावतीने करण्यात येणार आहे. या पाच दिवसीय प्रशिक्षण शिबीरात सांगली, सातारा, मराठवाडा व खानदेशमधील हजारो शेतकरी सहभागी होत असतात. शिबीरात माती परीक्षण, अधिक ऊस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, बियाणे मळा, रोग व कीड नियंत्रण व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी फायनान्स मॅनेजर जयेंद्र नाईक, लेबर अ‍ॅन्ड वेल्फेअर ऑफिसर अरूण पाटील,कार्यालयीन अधीक्षक निलेश देशमुख, पर्यावरण अभियंता सुयोग खानविलकर, वाहतूक अधिकारी गजानन प्रभुणे, लिगल ऑफिसर विक्रम मोरे, सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, सहाय्यक शेती अधिकारी अजय दुपटे, सॅनेटरी ऑफिसर विजय पवार, डॉ. विजय कुंभार यांच्यासह शेतकरी सभासद, सर्कल ऑफिसर, शेती मदतनीस व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment