आनेवाडी टोल नाक्याजवळ 45 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पुणे- बेंगलोर महामार्गावर असलेल्या आनेवाडी टोलनाका येथे जवळच असलेल्या शेतात 45 वर्षीय इसमाने स्वतः च्या हाताची नस कापून व गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आनेवाडी टोल नाक्याजवळ असणाऱ्या शेतामध्ये स्वतःच्या हाताच्या नसा कापून घेतले आहे. नंतर 45 वर्षीय व्यक्तीने ड्रीपच्या पाईपच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भास्कर मोहन गायकवाड (वय- 45, या. पाचवड, या. वाई) असे आत्महत्या केल्याचे इसमाचे नांव आहे. भास्कर गायकवाड यांचा शर्ट पूर्ण रक्ताने माखलेला होता.

भुईज पोलिस स्टेशनचे एपीआय आशिष कांबळे व वाईच्या डीवायएसपी शितल जानवे- खराडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सातारा येथील फॉरेन्सिक लॅब यांना बोलावून घेवून ब्लड टेस्टिंग साठी पाठवण्यात आले आहे. पुढील तपास एपीआय आशिष कांबळे करीत आहेत.

Leave a Comment