पाकिस्तानी नाही सुधाणार; POK मधील लाँच पॅडसवर ४५० दहशतवादी मोठया हल्ल्याच्या तयारीत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । संपूर्ण जग कोरोनाच्या करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानसारख्या देशाला सुद्धा कोरोनाची मोठी झळ पोहोचली आहे. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईच्या मार्गावर आहे. पण या परिस्थितीतही पाकिस्तान सुधारलेला नाही. त्याचे दहशतवादाला खतपाणी घालण्याचे उद्योग सुरुच आहेत. याच कारण म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील वेगवेगळ्या १४ लाँच पॅडसवर मोठया संख्येने दहशतवादी जमले आहेत. हे सर्व दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.

“पाकिस्तानतील विविध दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेले ४५० दहशतवादी या लाँच पॅडसवर असल्याची आमची माहिती आहे” असे या अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानने लाँच पॅडसवर दहशतवाद्यांची संख्या दुप्पट केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांकडे असलेल्या माहितीनुसार, ४५० दहशतवाद्यांपैकी २४४ लष्कर-ए-तोयबा, १२९ जैश-ए-मोहम्मद आणि ६० हिजबुल मुजाहिद्दीनचे दहशतवादी आहेत. अल बदर सारख्या छोटया दहशतवादी गटांचेही अतिरेकी इथे आहेत.

पाकिस्तानात चालणाऱ्या दहशतवादी कॅम्पसमधून हे अतिरेकी लाँच पॅडसवर पोहोचले आहेत. १६ दहशतवादी कॅम्पसपैकी ११ पाकव्याप्त काश्मीरमध्ये, २ पंजाब आणि ३ खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये आहेत. इतक्या मोठया संख्येने दहशतवादी लाँच पॅडसमध्ये असल्याने पाकिस्तानकडून एखादा मोठा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडेच गुप्तचर यंत्रणांनी लाँच पॅडसवर २३० च्या आसपास दहशतवादी असल्याची माहिती दिली होती. हिंदुस्थान टाइम्सने ९ एप्रिलला हे वृत्त दिले होते. ‘मागच्या २ ते ३ आठवडयात चित्र बदलले आहे’ असे या अधिकाऱ्याने सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment