मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० : कोकणात 47 हजार कोटींची गुंतवणूक ; पुणे-औरंगाबादमध्येही रोजगाराच्या संधी उपलब्ध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना व्हायरसचा फटका उद्योग जगताला मोठ्या प्रमाणात बसला असून देखील महाराष्ट्राने मात्र या कठीण काळी देखील हजारो कोटींची गुंतवणूक खेचली आहे. त्यातील सर्वाधिक गुंतवणूक कोकण विभागाने आकर्षित करण्यात यश मिळविले आहे. एकूण गुंतवणुकीच्या तब्बल ४७ हजार ४५ कोटी (७७ टक्के) गुंतवणूक एकट्या कोकण विभागात झाली आहे.

त्याखालोखाल औरंगाबाद आणि पुणे विभागात गुंतवणुकीचे प्रमाण अधिक आहे. मात्र, यातील एकही उद्योग विदर्भात आलेला नाही. मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत देशातील २५ उद्योगसमूहांनी ६१ हजार ४२ कोटी ५३ लाख रुपयांच्या गुंतवणुकीबाबत परस्पर सामंजस्य करार केले आहेत. त्यात सर्वाधिक प्रतिसाद कोकणासाठी मिळालेला आहे.

अशी होणार गुंतवणूक

राज्यभरातील गुंतवणुकीची माहिती; वाचा कोणते प्रकल्प कोणत्या विभागात?

पुणे विभाग
– गोयलगंगा आयटी पार्क हिंजवडी फेज-४
१ हजार कोटी, रोजगार-१० हजार
– जीजी मेट्रोपोलीस आयटी पार्क-वाघोली
दीड हजार कोटी, रोजगार -१५ हजार
– ग्रॅविस फूड प्रोसेसिंग-केसुर्डी
७५ कोटी, रोजगार १००
– बजाज ऑटो-चाकण
६५० कोटी, रोजगार-अडीच हजार)
– ॲम्पस फार्मटेक्स अभियांत्रिकी-बारामती
१०४ कोटी, रोजगार २२०
– क्लीन सायन्स टेक्नॉलॉजी, रसायन- कुरकुंभ
१३२.४ कोटी, रोजगार ७५०
– सोनाई इटेबल्स-खाद्यतेल रिफायनरी-इंदापूर
१८९.५७ कोटी, रोजगार ३००

सातारा विभाग
– एक्साइड इंडस्ट्रीज-बॅटरी, फलटण
५०० कोटी, रोजगार १०००
– कोल्हापूर : सुनील प्लास्टिक इंडस्ट्रीज, विकसक – हातकणंगले
११० कोटी, रोजगार ५००

अमरावती विभाग
– श्रीधर कॉटसाइन-वस्त्रोद्योग, अमरावती
३६९ कोटी, रोजगार ५२०
– हरमन फिनोकेम-रसायन, अमरावती
५३६.५ कोटी, रोजगार दीड हजार

औरंगाबाद विभाग
– इन्स्पिरा इन्फ्रा, शेंद्रा-अ‍ौरंगाबाद
७५०० कोटी, रोजगार १० हजार

कोकण विभाग
– जुबिलंट फूड्स- अन्नप्रक्रिया- पाताळगंगा, रायगड
१५० कोटी, रोजगार ४००
– जेएसडब्लू स्टील-डोलवी रायगड
२० हजार कोटी, रोजगार ३०००
– सेंच्युअर फार्मा, अ‍ौषध निर्मिती- अंबरनाथ, ठाणे
३०० कोटी, रोजगार १५००
– के रहेजा, आयटी- टीटीएल ठाणे
७५०० कोटी, रोजगार ७० हजार
– इंडियन कॉर्पो- लॉजिस्टिक- भिवंडी ठाणे
११०४९.५ कोटी, रोजगार ७५ हजार
– कीर्तीकुमार स्टील उद्योग, वाडा, पालघर
७५०० कोटी, रोजगार ६० हजार
– मलक स्पेशालिटी-रसायन, महाड, रायगड
४५.५६ कोटी, रोजगार ६०
– रेन्युसिस इंडिया, अपारंपरिक ऊर्जा, पाताळगंगा
५०० कोटी, रोजगार दीड हजार

नाशिक विभाग
– सुमेरू पॉलिएस्टर-टेक्स्टाइल, नवापूर-धुळे
४२५ कोटी, रोजगार ५००
– नवापूर इंडस्ट्रीयल पार्क- इंडस्ट्रियल इन्फ्रा- नवापूर-धुळे
२०० कोटी, रोजगार १००
– जेनक्रेस्ट बायो-वस्त्रोद्योग

– भुसावळ-जळगाव
५०० कोटी, रोजगार ५००
– अंबर एंटरप्राइजेस-उत्पादन, सुपा-अहमदनगर
१०० कोटी, रोजगार २२०
– ग्रँड हॅण्डलूम-वस्त्रोद्योग – नरडाणा
१०६ कोटी, रोजगार २१०

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’