पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील पाऊस धोधो कोसळत असून गुरूवारी दिवसभरात 480 मिमी पाऊस पडला आहे. एका दिवसाचा 19 इंच पाऊसाची नोंद महाबळेश्वरमध्ये नोंद झाली असल्यामुळे महाबळेश्वर शहर जलमय झाले असल्याचे चित्र वेण्णालेकजवळ वेण्णा नदीने वाढलेल्या पाऊसामुळे धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाबळेश्वर पाचगणी रस्ता पाण्याखाली गेला असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. आपत्कालीन प्रशासकीय यत्रणा सतर्क असल्याची माहीती महाबळेश्वर तहसिल कार्यालयाने दिली आहे.
आपात्कालीन परीस्थीत तालुक्यांतील मुख्यालयाच्या ठीकाणी थांबण्याचे आदेश तहसिलदार सुषमा चैाधरी यांनी सर्व मडंल अधिकारी व तलाठी ग्रामसेवक यांना दिल्या आहेत . महाबळेश्वर तालुक्यांतील कांदाटी खोर्यातील चतुरबेट यादुर्गम तालुक्यांतील पुलावरुन कोयनेचे पाणी वाहील्यामुळे महाबळेश्वर तालुक्यांचा दुर्गम भाग म्हणुन ओळखल्या जाणार्या कादाटी खोर्याचा संपर्क तुटला आहे .
महाबळेश्वर तालुक्यांत एकाच दिवसाच १९ इंच पाऊसाची विक्रमी नोंद झाल्यामुळे महाबळेश्वर तालुक्यांतील पाऊसाने होणारे नुकसानाचे त्वरीत पंचनामे देण्याचे आदेश तहसिलदार सुषमा पाटील यांनी दिली आहे . आपात्काली परीस्थीत महाबळेश्वर तालुक्यांतील पाऊचा वाढता जोर पाहता शेतीचे नुकसान झाले आहे . याबाबत शासकीस यत्रना कामाला लागली आहे .