हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 27 ऑगस्टपासून Asia Cup 2022 च्या मुख्य फेरीचे सामने सुरू होणार आहेत. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्याचवेळी भारतीय संघ 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याद्वारे आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. या स्पर्धेत भारताचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. टीम इंडिया Asia Cup मध्ये आतापर्यंत सात वेळा चॅम्पियन बनली आहे. त्याखालोखाल श्रीलंकेने पाचवेळा तर पाकिस्तानला दोनदा ही ट्रॉफी मिळवण्यात यश आले आहे.
मात्र हे जाणून घ्या कि, Asia Cup स्पर्धेत भारतासाठी सर्वात यशस्वी फलंदाज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा आहे. 1990 ते 2012 या कालावधी मध्ये सचिनने एकूण 23 सामने खेळले. ज्यामध्ये त्याने 21 डावात 51.10 च्या सरासरीने 971 धावा केल्या. यादरम्यान त्याने दोन शतके आणि सात अर्धशतके झळकावली. या आशिया चषकात सचिनची सर्वोत्तम धावसंख्या 114 धावांची आहे.
Asia Cup स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्यात दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आहे. शर्माने देखील या स्पर्धेत आपल्या बॅटने भरपूर धाव केल्या आहेत. 2008 पासून या स्पर्धेत शर्माने भारतीय संघासाठी 27 सामने खेळले आहेत. यामधील 26 डावांत त्याने 42.04 च्या सरासरीने 883 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले तर त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 111 आहे.
Asia Cup स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करण्यात तिसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार विराट कोहली हा आहे. 2010 पासून आशिया चषक स्पर्धेत कोहलीने भारतीय संघासाठी 16 सामने खेळले आहेत. यामधील 14 डावात त्याने 63.83 च्या सरासरीने 766 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने तीन शतके आणि दोन अर्धशतके देखील झळकावली आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 धावा आहे.
Asia Cup स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करण्यात चौथ्या क्रमांकावर माजी महान कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. धोनीने 2008 ते 2018 या कालावधीत आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघासाठी 24 सामने खेळले आहेत. यामधील 20 डावांमध्ये त्याने 69.00 च्या सरासरीने 690 धावा केल्या आहेत. तसेच या स्पर्धेत त्याच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतके देखील आहेत. यामध्ये धोनीची सर्वोत्तम फलंदाजी नाबाद 109 आहे.
अनुभवी सलामीवीर शिखर धवनचे नाव या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र या वेळच्या Asia Cup स्पर्धेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. 2014 पासून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत धवनने 13 सामने खेळले आहेत. यामधील 13 डावात त्याने 51.08 च्या सरासरीने 613 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icccricketschedule.com/asia-cup-2022-schedule-team-venue-time-table-pdf-point-table-ranking-winning-prediction/
हे पण वाचा :
ICICI Bank च्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर पहा
Loan : एखाद्याच्या कर्जासाठी जामीनदार होण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी !!!
Dhanlaxmi Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याजदर तपासा
Business Idea : वर्षभर मागणी असलेल्या ‘या’ ड्रायफूटची लागवड करून मिळवा करोडो रुपये !!!
Post Office च्या ‘या’ विमा पॉलिसीमध्ये 299 रुपयांमध्ये मिळेल 10 लाखांचे विमा संरक्षण !!