Ladki Bahin Yojana 2024: लाडकी बहीण योजनेत 5 मोठे बदल; नव्या अटी जाणून घ्याच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ladki Bahin Yojana 2024 | राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana 2024) आज मोठे बदल करण्यात आले आहेत. याबाबतची नुकतीच सूचना ही जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये आता इथून पुढे महिलांना अर्ज करताना लाईव्ह फोटो द्यावा लागणार नाही, असे सांगितले आहे. यासह इथून पुढे नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती दिली आहे. या योजनेमध्ये आणखीन कोणते बदल झाले आहेत? याविषयी जाणून घेऊया.

योजनेमध्ये झालेले महत्त्वाचे बदल (Ladki Bahin Yojana 2024)

आज म्हणजेच १३ जुलै रोजी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा आणि अर्ज भरताना कोणतीही अडचणी येऊ नये, यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच या योजनेमधील काही महत्त्वाच्या अनेक अटींमध्ये बदल करण्यात आले. नव्या बदलानुसार, आता अर्ज भरताना महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाइन अर्ज भरताना ग्राह्य धरण्यात येणार आहे. थोडक्यात, इथून पुढे महिलांना फॉर्म भरताना लाईव्ह फोटो द्यावा लागणार नाही.

नवविवाहित महिलांसाठी अटीत सुधारणा

यापूर्वी अनेक नवविवाहित महिलांकडे रेशनकार्ड नसल्यामुळे अर्ज भरत असताना अडचण येत होती. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहित महिलांच्या पतीचे रेशन कार्डच उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच परराज्यात जन्म झालेल्या परंतु सध्या महाराष्ट्रात वास्तव असलेल्या महिलांना अर्ज भरताना पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. तसेच, 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड आणि 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड ही ग्राह्य असेल. यासह लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येईल.

दरम्यान, ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावी आणि त्याचा अधिक महिलांनी लाभ घ्यावा यासाठी या योजनेतंर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका / अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख व CMM, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. (Ladki Bahin Yojana 2024) लक्षात ठेवा की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.