कोल्हापूरात 5 बॉयलर कोंबड्या 100 रुपयांना, कोरोनाव्हायरसचा पोल्ट्रीवाल्यांना जबर दणका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | सतेज औंधकर

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका हा पोल्ट्री उद्योगाला बसला आहे. पर्यायानं चिकन दरावर याचा गंभीर परिणाम झाला आहे. एरव्ही 140 ते 160 रुपये किलो दराने चिकन विक्री होत होती परंतु आता कोरोना व्हायरसमुळे चिकनचे दर पडले आहेत. शंभर रुपयाला पाच बॉयलर कोंबड्या विकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ चंदगड तालुक्यातील पाटणे फाट्यावरचा आहे. एका टेम्पोतून हा विक्रेता शंभर रुपयांना पाच बॉयलर कोंबड्या विकत आहे. सकाळपासून या विक्रेत्याचा 5 टेम्पो माल खपला असल्याचं देखील यातून समजत आहे. अनेक लोक गाडीला दोन्ही बाजूला कोंबड्या बांधून घेऊन जाताना देखील या व्हिडिओत दिसत आहेत.