Telegram चे ‘हे’ 5 फीचर्स आहेत खूप उपयोगी, त्याविषयी जाणून घ्या

Telegram
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Telegram : सध्याच्या सोशल मीडियाचा वापर करता नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. सध्याच्या काळात इन्स्टंट मेसेजिंग ऍपची देखील खूप चलती आहे. यांमुळे दररोजची कामे खूपच आरामात करता येतात. यामध्ये WhatsApp हे सर्वांत लोकप्रिय ऍप आहे. मात्र असे असले तरी त्याला काही मर्यादा आहेत. WhatsApp प्रमाणेच Telegram ऍप देखील खूप वापरले जाते. यामध्ये असे काही फीचर्स आहेत जे इतर ऍप्सपेक्षा याला वेगळे बनवते. याची एक खास बाब अशी कि, यामध्ये मोठ्या साईज असलेल्या फाइल्स अगदी सहजपणे ट्रान्सफर करता येतील. यासोबतच त्यावर चित्रपट आणि वेब सीरीज देखील डाउनलोड करता येतात.

Telegram's Embrace of Contradiction - Lawfare

Telegram मध्ये एखाद्याला चुकून पाठवलेला मेसेजही एडिट केला जाऊ शकतो. यासोबतच आणखीही अनेक खास गोष्टी Telegram मध्ये पाहायला मिळतील. चला तर मग त्याविषयी जाणून घेऊयात…

चॅट फोल्डर तयार करा

आपण Telegram वर असे अनेक चॅनेल आणि ग्रुप्स फॉलो करतो जे वैयक्तिक चॅटमध्ये मिसळले जातात. हे सर्व चॅट्स एकाच पॅनलमध्ये ठेवल्याने गोष्टी समजून घेणे आणि पाहणे जरा अवघड होते. या समस्येवर मात करण्यासाठी, टेलिग्रामकडून ‘चॅट फोल्डर’ नावाचे एक फीचर्स ठेवण्यात आले आहे, ज्याच्या मदतीने आपले चॅट्स वेगवेगळ्या लेबलमध्ये म्हणजे करता येतील. याद्वारे टेलीग्राम पॅनेल क्लिअर करणे आणि म्हणजे करणे खूप सोपे होते.

Nearby People आणि groups ना Add करणे

याच्या मदतीने आपण तो नंबर कोणाशीही शेअर न करता टेलिग्राममध्ये जोडू शकतो. टेलीग्राम तुम्हाला टेलीग्राम युझर्स आणि लोकेशननुसार ग्रुप्स शोधण्याची परवानगी देतो.

How to Log Into Telegram on Your Phone or Computer

पाठवलेला मेसेज Edit करा

बऱ्याचदा असे घडते कि, आपण मेसेज पाठवतो आणि नंतर आपल्याला कळते की, यामध्ये काहीतरी चुकीचे लिहिले गेले आहे??? यासाठी Telegram कडून आपले पाठवलेले मेसेज Edit करण्याची सुविधा मिळते.

Sender च्या मेसेजला डिलीट करणे

आपल्याकडून पाठवला गेलेला मेसेज डिलीट करता येतो, मात्र टेलीग्राम आपल्याला Sender ने पाठवलेला मेसेज डिलीट करण्याची परवानगी देतो. इथे फक्त स्वतःसाठीच नाही तर Sender साठीही मेसेज डिलीट करता येईल आणि अशा प्रकारे हा मेसेज दोन्ही बाजूंनी डिलीट केला जाईल.

New Features of Telegram: These are the Telegram features that we wish to see on WhatsApp

एकापेक्षा जास्त खाती वापरता येईल

Telegram द्वारे आपल्याला एकाच एपवर अनेक खाती चालवता येतात. इथे नवीन खाते जोडण्यासाठी आपल्या प्रोफाइलच्या तळाशी असलेले + बटण दाबून नवीन खाते तयार करावे लागेल.

आपले चॅट लॉक करा

Telegram मध्ये प्रायव्हसी मिळत असल्याने ते जास्त लोकप्रिय देखील झाले आहे. हे फक्त सर्व्हरच्या बाजूला असलेल्या गोष्टींचे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन देत नाही तर युझर्सना आपले चॅट लॉक करण्याची देखील परवानगी देतो. यामुळे जेव्हा आपला डिव्‍हाइस दुसर्‍या कोणाच्या हाती जातो तेव्हा काळजी करण्याची गरज राहत नाही. टेलीग्राम कडून असे अनेक फीचर्स पुरवले जातात ज्यामुळे आपल्याला चॅटिंगचा आनंद घेता येतो.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://telegram.org/

हे पण वाचा :

‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये केली 290 पट वाढ

FD Rates : प्रेशर कुकर बनवणारी ‘या’ कंपनीच्या FD वर मिळते बँकांपेक्षा जास्त व्याज

Post Office च्या योजनेमध्ये फक्त 299 रुपयांमध्ये मिळेल 10 लाखांचा विमा

Wi-Fi Calling म्हणजे काय ??? Android किंवा iPhone वर अशा प्रकारे सुरू करा

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण, आजचे नवे दर पहा !!!