पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामध्ये 5 ग्र्याबर दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । युनिटी ग्रीन सोल्युशन्स या कंपनी मार्फत पुणे शहरातील झाडांपासून निर्माण होणारा कचरा उचलून विल्हेवाट लावण्याचे काम केले जाते. या कंपनी मार्फत तब्बल ४० गाड्यांची नेमणूक केलेली आहे. सुरु होणारा पावसाळा अन त्यामध्ये होणारी झाडपडी लक्षात घेता. युनिटी ग्रीन सोल्युशन्स तर्फे पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे ५ ग्र्याब्बर ट्रक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पुणे महापालिकेच्या उप आयुक्त आशा राऊत यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.

युनिटी ग्रीन या कंपनी मार्फत पुणे शहरातून झाडापासून निर्माण होणारा कचरा उचलला जातो. तो उचलला जाता असताना मजुरांचा वापर केला जातो. मात्र या मशीन मुळे मजुरांचा वापर कमी करता येणार आहे अन कमी वेळात जास्तीत जास्त कचरा उचलला जाण्यास मदत होणार आहे. पुणे शहरात ५ झोन आहेत त्याप्रमाणे ५ झोन मध्ये ५ ग्र्याब्बेर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत

या प्रसंगी बोलताना आशा राऊत मॅडम म्हणाल्या कि, या साधन सामग्रीमुळे कमी वेळात जास्त काम करता येईल अन पुणे शहर स्वछ ठेवण्यास मदत होईल. तर युनिटीचे समीर दुगाने यांनी पुणे शहर अधिक सुलभतेने स्वछ ठेवण्यासाठी आमची कंपनी नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे नमूद केले. यावेळी औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त संदीप खलाटे, युनिटी ग्रीन सोल्युशन्स चे समीर दुगाने, विशाल भुजबळ, श्रीश्रीमाळ, सुनिल पाटील, पोपट खैरे विशाल वाघमारे व पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते