Wednesday, October 5, 2022

Buy now

नागपूर हादरलं ! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळली 5 अर्भक

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – काही महिन्यांपूर्वी वर्ध्यात एका हॉस्पिटलच्या आवारात अर्भकाच्या कवट्या आणि हाडे सापडली होती. या प्रकरणाचा पोलिसांकडून अजूनही तपास सुरु आहे. त्यातच आता नागपूरमध्ये लखडगंज परिसरात कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये पाच अर्भकं सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
हि धक्कदायक घटना नागपूर शहरातील लखडगंज भागामध्ये घडली आहे. केटी वाईन शॉप्सजवळील कचरा डंपिंग यार्डमध्ये बुधवारी सायंकाळी पाच अर्भकं आढळली आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही स्थानिक लोकांना हि अर्भके दिसली. यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी पाच अर्भक आढळून आले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पाचही अर्भक ताब्यात घेतले आहे. हे पाच अर्भक कुणी आणि का टाकले? याचा तपास पोलीस करत आहेत. लकडगंज पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.