पाककला ही एक सुंदर कला आहे, अनेकांना जेवण बनवायला आणि दुसऱ्यांना विविध पदार्थ करून घालायला खूप आवडते. मात्र सध्याच्या काळात गृहिणी घर आणि नोकरी दोन्ही गोष्टी सांभाळतात त्यामुळे त्यांच्याकडे खूप कमी वेळ असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही काही हॅकचा अवलंब केला तर तुमचे काम अधिक सोपे होईल. किचन हॅक या मजेदार छोट्या युक्त्या आहेत ज्यामुळे तुमचे काम सोपे होते. या लेखात आम्ही तुम्हाला काही सोप्या किचन हॅकबद्दल सांगणार आहोत.
पुदिना आणि कोथिंबीर स्टोअर करा
पुदिना आणि कोथिंबीर ही स्वयंपाकघरातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे. भाजी घेताना कोथिंबीर, पुदिना फुकट मागवण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. हे तुमच्या जेवणाची चव वाढवतात. पण दुर्दैवाने ते फार काळ ताजे राहत नाहीत. त्यांना ताजे ठेवण्यासाठी, आपण त्यांना हवाबंद काचेच्या कंटेनरमध्ये ठेवू शकता आणि कंटेनर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता. यामुळे ते जास्त काळ ताजे राहतील.
लसूण
लसूण सोलण्यासाठी तुम्हाला फक्त झाकण असलेली भांडी किंवा दोन लहान वाटी एकत्र ठेवण्याची गरज आहे. लसूण पाकळ्या घालून जोरात शेक करा तुम्हाला दिसेल की लसणाच्या पाकळया वेगळ्या झालेल्या असतील. यामुळे तुमची नखं जास्त काळ अडकणार नाहीत आणि तुमचे कामही होईल.
ब्लेंडर ब्लेड करा धारदार
जास्त वापरामुळे ब्लेंडरचे ब्लेड बोथट होऊ शकतात. मग ते तुमच्यासाठी तुमच्या स्वयंपाकाचे साहित्य चांगले मिसळण्याचे काम करू शकणार नाही. रॉक सॉल्ट म्हणजे खडे मीठ वापर करून तुम्ही तुमचे ब्लेंडर च्या ब्लेडला धार करू शकता. तुमच्या ब्लेंडरमध्ये थोडं खडे मीठ घाला आणि एक किंवा दोनदा ब्लेंडर फिरवा.
भाज्या स्वच्छ ठेवा
पाण्यात थोडासा बेकिंग सोडा मिसळा आणि त्यात तुमच्या भाज्या भिजवा. सोडा तुमच्या भाज्यांमधून सर्व प्रकारची घाण आणि कीटकनाशके काढून टाकेल. जर तुम्हाला तुमचे अन्न रसायनांपासून मुक्त ठेवायचे असेल तर ते झाकण असलेल्या काचेच्या डब्यात ठेवा. प्लॅस्टिकऐवजी, काच तुमच्या अन्नामध्ये कोणतेही हानिकारक रसायने मिसळत नाही.
लिंबाचा रस
लिंबू अशी एक गोष्ट आहे जी तुम्ही स्वयंपाकघरात नियमित वापरता. बऱ्याच वेळा फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर लगेचच त्यातून ज्यूस काढणे खूप अवघड वाटते. खूप मेहनत करूनही फारसा रस निघत नाही. त्यामुळे एक छोटी युक्ती आहे जी तुम्ही वापरून पाहू शकता, त्यामुळे तुमचे काम अधिक सोपे होईल. फ्रीजमधून लिंबू काढल्यानंतर 10-20 सेकंद मायक्रोवेव्ह करा, यामुळे तुमची मेहनत कमी होईल आणि लिंबाचा रस पिळण्यास मदत होईल.